संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दाऊदच्या ‘डी-कंपनी’बाबत चुकीचा उल्लेख; भारताने UN ला सुनावले खडेबोल

दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 'डी-कंपनी'ला भारतात स्थित असा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका विशेष प्रतिनिधीच्या अहवालावर भारताने अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दाऊदच्या ‘डी-कंपनी’बाबत चुकीचा उल्लेख; भारताने UN ला सुनावले खडेबोल
Dawood Ibrahim D Company India based error UN

फरार गुंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’ला भारतात स्थित असा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका विशेष प्रतिनिधीच्या अहवालावर भारताने अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी विषयावरील अहवालात आढळलेल्या या गंभीर आणि अक्षम्य तथ्यात्मक चुकीवर भारताने उघडपणे टीका केली आहे. अशा प्रकारच्या बिनबुडाच्या चुका आणि संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांमधील उत्तरदायित्वाचा अभाव जागतिक संस्थेच्या विश्वासार्हतेला आणि पारदर्शकतेला तडा देणारा आहे, असा गंभीर इशाराही भारताकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा – आंदोलनकर्त्यांनो लक्ष द्या! आता मुलांच्या आंदोलनातील सहभागासाठी पालकांना धरणार जबाबदार; सरकारची कडक कायद्यांना मंजुरी

UN च्या बैठकीत भारताची कडक भूमिका

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव राघू पुरी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ‘तिसऱ्या समिती’च्या बैठकीत हा कळीचा मुद्दा उपस्थित केला. ‘दहशतवादाचा सामना करताना मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्यांचे रक्षण’ या विषयावर विशेष प्रतिनिधी बेन सॉल यांनी सादर केलेल्या अहवालातील गंभीर चुकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. पुरी म्हणाले की, विशेष प्रतिनिधी तथ्यहीन अहवाल प्रसिद्ध करतात आणि त्याबाबत कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, ही बाब अतिशय चिंतेची आहे. यामुळे सदस्य देशांना सार्वजनिक चर्चेपूर्वी आपली योग्य बाजू मांडण्याची संधीच मिळत नाही.

दाऊद इब्राहिम 1993 पासून भारतात वॉन्टेड

अहवालातील चुकीच्या विधानाचा स्पष्ट शब्दांत समाचार घेताना पुरी म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने 2003 मध्ये दाऊद इब्राहिमला ‘अल-कायदा निर्बंध यादीत’ समाविष्ट केले होते. मात्र, त्याला ‘भारतात स्थित’ म्हणणे हे वास्तवाचा विपर्यास करणारे आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर दाऊद इब्राहिम भारतातून पळून गेला होता आणि तो भारतात ‘वॉन्टेड’ आहे. हीच वस्तुस्थिती संयुक्त राष्ट्रांच्या ‘1267 निर्बंध प्रणाली’मध्ये स्पष्टपणे नोंदवलेली आहे. भारत सोडून पळाल्यानंतरच अल-कायदा आणि ओसामा बिन लादेनशी असलेल्या संबंधांमुळे त्याचे नाव यादीत आले होते. पुढे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधत पुरी यांनी स्पष्ट केले की, दाऊद ज्या देशात आश्रय घेऊन आहे, त्याच देशात अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन 2011 मध्ये अमेरिकेच्या ‘नेव्ही सील्स’ कारवाईत मारला गेला होता. अशा मोठ्या चुका जागतिक संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवतात, असे भारताने ठामपणे बजावले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number