Chennai Crime News : एक्स गर्लफ्रेंडला ट्रेनसमोर ढकलणाऱ्या आरोपीची मृत्युदंडाची शिक्षा माफ; कोर्टानं बदलला निर्णय, नेमकं प्रकरण काय?

ब्रेकअपनंतर संतापलेल्या सतीशने सेंट थॉमस माउंट स्टेशनवर मुलीचा पाठलाग केला. ती प्लॅटफॉर्मवर चालत असताना येणाऱ्या ट्रेनची वेळ पाहून त्याने तिला रुळावर ढकलले.

Chennai Crime News : एक्स गर्लफ्रेंडला ट्रेनसमोर ढकलणाऱ्या आरोपीची मृत्युदंडाची शिक्षा माफ; कोर्टानं बदलला निर्णय, नेमकं प्रकरण काय?

Chennai Crime News: चेन्नईतील सेंट थॉमस माउंट स्थानकात 2022 मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत माजी प्रेयसीला ट्रेनसमोर ढकलून तिला संपवणाऱ्या आरोपीची मृत्युदंडाची शिक्षा मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. डी. सतीश नावाच्या या आरोपीची शिक्षा कमी करत न्यायालयाने ती जन्मठेपेत रूपांतरित केली. तसेच, जन्मठेपेतील पहिली 20 वर्षे कोणतीही कायदेशीर सूट किंवा शिक्षेत कपात, पॅरोल मिळणार नाही असा स्पष्ट आदेशही न्यायालयाने दिला.

काय आहे नेमकं प्रकरण? 

ब्रेकअपनंतर संतापलेल्या सतीशने सेंट थॉमस माउंट स्टेशनवर मुलीचा पाठलाग केला. ती प्लॅटफॉर्मवर चालत असताना येणाऱ्या ट्रेनची वेळ पाहून त्याने तिला रुळावर ढकलले. ती उठण्याआधीच ट्रेन तिच्यावरून गेली आणि तिचा मृत्यू झाला. न्यायालयाने नमूद केले की हे कृत्य पूर्वनियोजित होते. कारण घटनेच्या आधीच्या दिवशीदेखील आरोपी स्टेशनवर तिची वाट पाहत होता.

हेही वाचा – Raisen Crime Case: अखेर 300 पोलिसांनी प्रयत्न केल्यानंतर सलमानला अटक; सहा वर्षांच्या मुलीवर केला होता अत्याचार

नातेसंबंधांची पुष्टी व छळाचे पुरावे

न्यायमूर्ती एन. सतीश कुमार आणि एम. जोथीरामन यांच्या खंडपीठाने गुरुवारी निकाल देताना म्हटले की आरोपी व मृत युवतीमध्ये प्रेमसंबंध होते, हे साक्षीदारांच्या जबाबांमधून तसेच अन्य पुराव्यांमधून स्पष्ट होते. आरोपीने पूर्वीही मुलीचा पाठलाग केला होता, तिचा छळ केला होता, तसेच महाविद्यालयाबाहेर गोंधळ घातल्यामुळे तिच्या कुटुंबाकडून त्याच्यावर तक्रारीही दाखल झाल्या होत्या.

प्रेमात अपयश आल्याने रागाच्या भरात गुन्हा

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की संबंध तुटल्यानंतर आरोपीने सूडाच्या भावनेतून मुलीला मारण्याचा निर्णय घेतला. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या म्हणण्यांवरून त्याने हे कृत्य रागाच्या भरात, परंतु स्पष्ट तरुणीला संपवण्याच्या हेतूने केले असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

हेही वाचा –Maharashtra Crime News: राज्यातील गुन्हेगारी काही थांबेना; आता 'चादर गँग' चा या शहरात धुमाकूळ

कुटुंब उद्ध्वस्त… तरीही मृत्युदंड नाही

न्यायालयाने म्हटले की मुलीच्या मृत्यूचा तिच्या कुटुंबावर अत्यंत भीषण परिणाम झाला. तिच्या वडिलांनीही त्यानंतर जीनव संपवलं. तसेच कर्करोगाने त्रस्त असलेल्या आईचेही निधन झाले. तरीही, आरोपी मानसिक व भावनिकदृष्ट्या अस्थिर होता, त्याचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता, तसेच गुन्हा घडताना तो तरुण होता. या कारणांवर आधारित न्यायालयाने मृत्युदंडाऐवजी सशर्त जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number