Judge Death Case: ‘बाबा, आता जगणं कठीण झालंय…’; तरुण न्यायाधीशाने संपवलं जीवन; पत्नीवर गंभीर आरोप, तपासात धक्कादायक खुलासे

पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून घटनेमुळे कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Judge Death Case: ‘बाबा, आता जगणं कठीण झालंय…’; तरुण न्यायाधीशाने संपवलं जीवन; पत्नीवर गंभीर आरोप, तपासात धक्कादायक खुलासे

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरली आहे. दिल्लीच्या उत्तर-पूर्वी जिल्ह्यातील जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणात सचिव म्हणून कार्यरत असलेले 30 वर्षीय न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी शनिवारी (2 एप्रिल 2026) आत्महत्या केली. दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेनंतर कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेताना आता काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मृत्यूपूर्वी वडिलांना केला होता फोन

अमन कुमार शर्मा हे मूळचे राजस्थानमधील अलवरचे रहिवासी होते. आत्महत्येच्या आदल्या रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या वडिलांना फोन केला होता. "पापा, मी खूप चिंतेत आहे, आता जगणं कठीण झालंय," असे शब्द त्यांनी वापरले होते. त्यांच्या मुलाचा असा हताश फोन आल्यावर चिंतेत पडलेले वडील तातडीने अलवरहून दिल्लीला पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना मुलगा आणि सून यांच्यात तीव्र वाद सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

घरगुती वादाचा करुण अंत

अमन यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू होते. घटनेच्या काही वेळ आधीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. अमन यांची पत्नी देखील एक न्यायिक अधिकारी आहे. नातेवाईकांच्या दाव्यानुसार, भांडणावेळी पत्नी मोठ्याने ओरडत होती आणि अमन ढसाढसा रडत होती. घरात पत्नीचा हस्तक्षेप खूप वाढला होता आणि अमन मानसिक दबावाखाली होते. वाद इतका विकोपाला गेला होता की, पत्नीने वडिलांनाही घराबाहेर जाण्यास सांगून पोलीस बोलावण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा: Pune Bhor Crime Update: अखेर 4 तासांनंतर नवले पूल मोकळा! मुख्यमंत्र्यांचा फोन अन् पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं

बाथरूममध्ये घेतला अखेरचा श्वास

शनिवारी सकाळी पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर मानसिक संतुलन बिघडलेल्या अमन यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने संशय बळावला आणि नंतर त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती अमन यांचे मेहुणे शिवम यांनी दुपारी 1 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी अमन यांची पत्नी आणि इतर नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

कॉल डिटेल्स आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा तपास

सफदरजंग एन्क्लेव्ह पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. अमन शर्मा यांचा मोबाईल फोन, कॉल डिटेल्स आणि त्यांनी घरी व कार्यालयात वापरलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत. सुसाईड करण्यापूर्वी अमन यांच्या आयुष्यात काही असामान्य घडामोडी घडल्या होत्या का, याचा शोध या उपकरणांच्या विश्लेषणातून घेतला जाईल. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

कर्तव्यदक्ष न्यायाधीशाचा असा झाला शेवट

अमन शर्मा यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. 2018 मध्ये पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यावर 2021 मध्ये ते न्यायिक सेवेत दाखल झाले होते. कडकडडूमा कोर्टात ते पूर्णवेळ सचिव म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची बहीण देखील आयएएस (IAS) अधिकारी असून सध्या जम्मूमध्ये कार्यरत आहे. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण न्यायाधीशाने घरगुती वादातून असे पाऊल उचलल्यामुळे त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: Pravin Tarde On Pune Bhor Crime Update: "त्या नराधमाचे एन्काऊन्टर झाले तरच मानू, अन्यथा…" नसरापूर प्रकरणी प्रवीण तरडे संतापले, पोस्ट करत दिला थेट इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number