LPG Leak Incident: वाढदिवसासाठी नवीन ड्रेस घेतला, पण त्याआधीच चिमुकली सोडून गेली; गॅस गळतीमुळे चिमुकलीचा दुर्दैवी अंत

दोन्ही बहिणी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी लहान मुलीला मृत घोषित केले. पोलिस आणि फॉरेन्सिक पथक या घटनेचा तपास करत आहेत.

LPG Leak Incident: वाढदिवसासाठी नवीन ड्रेस घेतला, पण त्याआधीच चिमुकली सोडून गेली; गॅस गळतीमुळे चिमुकलीचा दुर्दैवी अंत

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस गळतीमुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पूर्व दिल्लीतील गाझीपूर परिसरातील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये गॅस गळती झाल्याने अडीच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना रविवारी दुपारी घडली. गाझीपूर येथील आशीर्वाद अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये कुटुंब राहत होते. त्या वेळी घरात आई आणि दोन मुली होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजून 19 मिनिटांनी पीसीआर कॉलद्वारे घरातून रासायनिक वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बहिणी खोलीत खेळत असताना अचानक बेशुद्ध झाल्या. त्यानंतर दोन्ही मुलींना तातडीने नोएडा सेक्टर 11 येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अडीच वर्षांच्या मुलीला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर तिची सात वर्षांची मोठी बहीण उपचारानंतर स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पॅनेल नियुक्त केले आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या प्राथमिक तपासणीत एलपीजी गॅसच्या गळतीमुळे विषबाधा होऊन मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गुन्हे तपास पथकानेही घटनास्थळी तपास केला.

हेही वाचा: Mumbai Water Storage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा? सातही धरणांमध्ये साठा निम्म्यापेक्षा कमी; पुढील काही महिने पाणी जपून वापरण्याचा इशारा

तज्ज्ञांच्या मते, एलपीजी गॅस हवेमधील ऑक्सिजनपेक्षा जड असल्यामुळे तो जमिनीच्या जवळ साचतो. त्यामुळे लहान मुलांवर त्याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो, कारण त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी असते आणि विषारी वायूंना ते अधिक संवेदनशील असतात.

दरम्यान, मृत मुलीचा तिसरा वाढदिवस केवळ दोन महिन्यांवर आला होता. तिचे वडील मोहम्मद रहीद हे व्यवसायाने टेलर असून मुलीच्या वाढदिवसासाठी त्यांनी खास ड्रेस तयार करण्यासही सुरुवात केली होती. मात्र अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी फ्लॅटची तपासणी करून कोणतेही संशयास्पद संकेत आढळले नसल्याचे सांगितले आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही फ्लॅटची पाहणी करून गॅस गळती किंवा इतर रासायनिक कारणांमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता तपासली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा: Pakistan Afghanistan Airstrike: इराण-इस्रायल संघर्षानंतर आता पाकिस्तान-अफगाणिस्तान आमनेसामने; थेट रुग्णालयावर बॉम्बहल्ला, 400 जणांचा मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number