Saturday, December 06, 2025 11:54:48 AM

Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई; मास्टरमाईंड आमिर राशिद अली 10 दिवस NIA कस्टडीमध्ये

तपासात उमर नबीसोबत त्याने आत्मघाती हल्ल्याची योजना आखल्याचे उघड झाले. फरीदाबाद मॉड्यूल, स्फोटक जप्ती आणि अल फलाह विद्यापीठातील अनियमिततेचा तपास सुरू आहे.

delhi blast case दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई मास्टरमाईंड आमिर राशिद अली 10 दिवस nia कस्टडीमध्ये

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्ब विस्फोट प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपी आमिर राशिद अली याला दिल्लीच्या न्यायालयाने 10 दिवसांच्या NIA (National Investigation Agency) कोठडीला पाठवले आहे. NIA ने त्याला 16 नोव्हेंबर रोजी अटक करून आज 17 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर केले. या हल्ल्यात 10 नोव्हेंबर रोजी विस्फोटकांनी भरलेल्या कारचा मोठा स्फोट झाला होता, ज्यात 13 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले.

NIA च्या तपासात उघड झाले की या हल्ल्यात वापरलेली कार जम्मू–कश्मीरमधील पुलवामाचा डॉक्टर उमर नबी चालवत होता. उमर एका दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेला होता. या मॉड्यूलचा धागा फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात सापडलेल्या विस्फोटकांनंतर समोर आला. तपासानुसार, अटक केलेला आमिर हा पंपोर (संबूरा), जम्मू-कश्मीर येथील रहिवासी असून त्यानेच बॉम्ब हल्ल्याचा संपूर्ण कट रचला होती. त्याने आत्मघाती हल्लेखोर उमरसोबत मिळून कार ब्लास्टची योजना आखली.

हेही वाचा: Sheikh Hasina Verdict : शेख हसीना दोषी, विशेष न्यायालयाने सुनावली मृत्युदंडाची शिक्षा

उमर फरीदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होता. त्यानेच स्वतःच्या नावावर असलेली कार विस्फोटकांनी भरून दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नेऊन उडवली. NIA ने उमरकडे असलेले अजून एक वाहनही जप्त केले आहे आणि त्याचे फॉरेन्सिक तपास सुरू आहेत.

आतापर्यंत तपास यंत्रणेने 73 साक्षीदारांची चौकशी केली असून जखमी पीडितांचीही माहिती गोळा केली जात आहे. दरम्यान, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तपास आणि विद्यापीठातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी अल फलाह यूनिव्हर्सिटीच्या चेअरमनला दोन समन्स जारी करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने विद्यापीठात फसवणूक आणि बनावटगिरीच्या दोन FIR नोंदवल्या आहेत. UGC (University Grants Commission) आणि NAAC (National Assessment and Accreditation Council) यांनी अलीकडेच या विद्यापीठाबद्दल गंभीर शंका व्यक्त करत "मोठ्या अनियमितता" निदर्शनास आणल्या. या गैरव्यवहारांची माहिती दोन्ही संस्थांनी अधिकृतरीत्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांना पाठवली आहे.

हेही वाचा: India US LPG Deal : मोदी सरकारचा ट्रम्पसोबत मोठा करार, भारत आता अमेरिकेकडून एलपीजी खरेदी करणार


सम्बन्धित सामग्री