Wednesday, July 09, 2025 09:03:54 PM

DGCA च्या चौकशीत मोठा खुलासा! प्रमुख विमानतळांवरील विमान वाहतूक व्यवस्थेत आढळल्या अनेक त्रुटी

या त्रुटींमध्ये विमानांमध्ये दोषांची पुनरावृत्ती आणि धावपट्टीवरील मध्यवर्ती रेषेचे चिन्ह फिकट होणे यांचा समावेश आहे.

dgca च्या चौकशीत मोठा खुलासा प्रमुख विमानतळांवरील विमान वाहतूक व्यवस्थेत आढळल्या अनेक त्रुटी
Edited Image

नवी दिल्ली: अहमदाबादमधील विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विविध दृष्टीकोनातून अपघाताची चौकशी करत आहे. दरम्यान, विमान वाहतूक नियामक डीजीसीएने मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, प्रमुख विमानतळांवर केलेल्या देखरेखीमध्ये विमान वाहतूक व्यवस्थेत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींमध्ये विमानांमध्ये दोषांची पुनरावृत्ती आणि धावपट्टीवरील मध्यवर्ती रेषेचे चिन्ह फिकट होणे यांचा समावेश आहे. यामध्ये उड्डाण ऑपरेशन्स, विमानाची हवाई योग्यता, धावपट्टी सुरक्षा, हवाई वाहतूक नियंत्रण, दळणवळण आणि नेव्हिगेशन प्रणाली यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा - रेल्वेने प्रवास करणे महागले! तिकिटांच्या किमतीत वाढ वाढ; 1 जुलैपासून लागू होणार नवीन दर

विमानांच्या देखरेखीमध्ये आढळलेल्या त्रुटी - 

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संबंधित विमान कंपन्यांची नावे उघड न करता एका निवेदनात म्हटले आहे की, संबंधित पक्षांना देखरेखीमध्ये आढळलेल्या त्रुटींबद्दल माहिती देण्यात आली आहे आणि त्यांना सात दिवसांत सुधारणात्मक कारवाई करण्यास सांगितले आहे. डीजीसीएच्या संयुक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखालील 2 पथकांनी दिल्ली आणि मुंबईसह प्रमुख विमानतळांवर रात्री आणि सकाळी व्यापक देखरेख केली. देखरेखीदरम्यान, टायर खराब झाल्यामुळे एक देशांतर्गत उड्डाण थांबवण्यात आले आणि आवश्यक दुरुस्तीनंतरच त्यांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा इराण-इस्रायल युद्धादरम्यान एअर इंडियाने जारी केला विशेष सल्लागार

देखरेखीचा अभाव आणि अपुरी दुरुस्ती - 

तथापी, डीजीसीएने पुढे म्हटले आहे की, देखरेखीमध्ये असेही आढळून आले की अनेक प्रकरणांमध्ये विमानांमध्ये वारंवार त्रुटी आढळून आल्या. यावरून देखरेखीचा अभाव आणि अपुरी दुरुस्ती दिसून येते. याशिवाय, या तपासणीत असेही आढळून आले की एक सिम्युलेटर विमानाच्या कॉन्फिगरेशनशी जुळत नव्हता आणि सॉफ्टवेअरची सध्याची आवृत्ती देखील अपडेट केलेली नव्हती. 
 


सम्बन्धित सामग्री