E20 Petrolचा वापर वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न; मात्र, आर्थिक सल्लागारांचा मोठा इशारा, शिवाय जुन्या वाहनांसाठी…

भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी E20 पेट्रोलच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे.

E20 Petrolचा वापर वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न; मात्र, आर्थिक सल्लागारांचा मोठा इशारा, शिवाय जुन्या वाहनांसाठी…

E20 Petrol E10 Petrol Update: भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी E20 पेट्रोलच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे (V Anantha Nageswaran ethanol blending advice). त्यांनी जुन्या वाहनांसाठी E10 सारखा कमी इथेनॉल मिश्रित इंधनाचा पर्याय पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. देशात BS4 मानकांपूर्वी तयार झालेल्या सुमारे 75 ते 80 दशलक्ष जुन्या दुचाकी सध्या वापरात आहेत. या वाहनांची इंजिने आणि रबर सील्स E20 पेट्रोलशी सुसंगत नसल्याने ती लवकर खराब होण्याचा धोका असतो. या भागांची फेररचना (Retrofitting) करणे अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने पेट्रोल पंपांवर E10 चा पर्याय देणे दुचाकी चालकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो.

मक्याच्या वाढत्या वापरामुळे अन्नधान्य अन् तेलबिया पिकांवर परिणाम
नागेश्वरन यांच्या मते केवळ इंजिनची समस्या हा मुख्य विषय नसून इथेनॉल निर्मितीसाठी बदलत चाललेली पीक पद्धत हा चिंतेचा विषय आहे. सध्या इथेनॉलच्या एकूण गरजेपैकी जवळपास अर्धी गरज मक्याद्वारे भागवली जात आहे. मक्याला मिळणाऱ्या निश्चित दरवाढीमुळे शेतकरी इतर अन्न पिकांऐवजी मक्याकडे वळत आहेत. डिस्टिलेशननंतर उरणारे धान्य जनावरांचे खाद्य म्हणून विकले जात असल्याने सोयाबीन पेंडीच्या दरावर आणि परिणामी तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितांवर विपरीत परिणाम होत आहे.

हेही वाचा – Oil Price Hike: किचनचं बजेट कोलमडलं! खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले; मोहरी, शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ

E20 बाबत केंद्र सरकारची ठाम भूमिका अन् वाहतुकीची गुंतागुंत
तर, दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने E20 हेच पेट्रोलचे मानक मिश्रण कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. पेट्रोल पंपांवर E10 आणि E20 असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिल्यास वितरणाचा खर्च आणि वाहतुकीची गुंतागुंत मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारी आकडेवारीनुसार, E10 साठी डिझाइन केलेल्या वाहनांमध्ये E20 वापरल्यास इंधन कार्यक्षमतेत (Fuel Efficiency) अवघी 3 ते 5 टक्के घट होते, मात्र इंजिन पूर्णपणे खराब झाल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

अन्न विरुद्ध इंधन समीकरणाचे सखोल मूल्यमापन करण्याची आग्रही मागणी
E20 कडे पूर्णपणे वळण्यापूर्वी जमीन, पाण्याचा वापर आणि पीक पद्धतींचे सखोल 'कॉस्ट-बेनेफिट' विश्लेषण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागेश्वरन यांनी अधोरेखित केले. एकदा शेतीची जमीन अन् पाणी इंधन निर्मितीकडे वळवले की ते पुन्हा अन्न पिकांकडे आणणे कठीण जाते. त्यामुळे E20 धोरणाचा सध्या पुनर्विचार करावा, मक्याला मिळणारा अवाजवी फायदा दूर करावा आणि अन्न व इंधन यांच्यातील देवाणघेवाणीचे संपूर्ण मूल्यांकन केल्यावरच पुढील पावले उचलावीत, अशी शिफारस त्यांनी केली आहे.

हेही वाचा – LPG KYC Deadline Extended: LPG ग्राहकांना मोठा दिलासा; ई-केवायसीची अंतिम मुदत वाढली; पाहा नवी तारीख

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number