Cough Syrup Row: मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये अनेक मुलांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या उत्पादक श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या सात ठिकाणी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापेमारी केली. ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत करण्यात आली आहे.
श्रीसन फार्माचे मालक जी रंगनाथन यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली. ED अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात पीएमएलए अंतर्गत चेन्नईतील सात ठिकाणी छापे टाकले गेले, ज्यामध्ये तामिळनाडू औषध नियंत्रण कार्यालयाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.
हेही वाचा - Y Puran Kumar Death: आयपीएस पूरण कुमारच्या लॅपटॉपमध्ये दडलंय मृत्यूचं रहस्य; शवविच्छेदनामुळे तपास थांबला?, वाचा सविस्तर
TNFDA च्या चुका उघडकीस
ईडीने तामिळनाडू अन्न आणि औषध प्रशासन (TNFDA) च्या उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवरही छापे टाकले. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तपासणीत TNFDAच्या त्रुटी उघडकीस आल्या होत्या. तथापी, Sresan Pharma ला TNFDA कडून 211 मध्ये परवाना मिळाला होता, पण त्यांचे कामकाज एक दशकाहून अधिक काळ अनियंत्रित सुरु होते. CDSCO ने म्हटले की, Sresan Pharma च्या कोणत्याही ऑडिटमध्ये CDSCO सहभागी नव्हता. राज्य FDA ने CDSCO ला माहिती न दिल्यामुळे ही कंपनी CDSCO च्या डेटाबेसमध्ये समाविष्ट नव्हती.
हेही वाचा - Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती
कोल्ड्रिफ वापरावर विविध राज्यांची बंदी
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांच्या मृत्यूनंतर Coldrif च्या वापराबाबत चिंता व्यक्त केली गेली. यापासून मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसारख्या अनेक राज्यांनी कफ सिरपवर बंदी घातली. तथापी, तामिळनाडूमध्ये, जिथे कोल्ड्रिफ उत्पादकाचे युनिट आहे तेथे राज्य सरकारला नमुने ‘भेसळयुक्त’ असल्याचे आढलळे. दरम्यान, तामिळनाडूचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा सुब्रमण्यम यांनी सांगितले, औषध नियंत्रक विभाग सर्व बाजूंनी तपास करेल, ज्यामध्ये कालबाह्य औषधे पुरवली गेली आहेत का, हे देखील तपासले जाईल. तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.