आई-वडिलांच्या जुन्या नोंदी देण्याची कटकट संपली; फॉर्म 6 मधील वादग्रस्त ‘SIR’ घोषणापत्र अखेर हटवलं

नवीन मतदार ओळखपत्रासाठी अथवा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी भरल्या जाणाऱ्या 'फॉर्म 6' सोबत आतापर्यंत जोडलेले 'SIR' (विशेष सखोल पुनरावलोकन) संदर्भातील अतिरिक्त घोषणापत्र आयोगाने हटवले आहे.
ECINet portal Form 6 declaration removed
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; फॉर्म 6 मधून 'SIR' भाग हटवला

Form 6 SIR Update: निवडणूक आयोगाने बुधवारी मध्यरात्री आपल्या अधिकृत ‘ECINet’ पोर्टलवर एक महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. नवीन मतदार ओळखपत्रासाठी अथवा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी भरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म 6’ सोबत आतापर्यंत जोडलेले ‘SIR’ (विशेष सखोल पुनरावलोकन) संदर्भातील अतिरिक्त घोषणापत्र आयोगाने हटवले आहे. ज्या राज्यांमध्ये ‘SIR’ ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथील पोर्टलवरून हे घोषणापत्र काढून टाकण्यात आले आहे. 26 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानंतर अवघ्या 4 दिवसांत निवडणूक आयोगाने हा तातडीचा बदल अंमलात आणला आहे.

काय होता वाद अन् काय विचारले जात होते प्रश्न?

मतदार यादीच्या छाननी आणि सुधारणा प्रक्रियेदरम्यान ‘फॉर्म 6’ सोबत ‘Annexure D’ नावाचे एक अतिरिक्त घोषणापत्र जोडण्यात आले होते. या घोषणापत्रामध्ये नवीन अर्जदारांना त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या मतदार नोंदींबद्दल काही गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जात होते. यामध्ये मागील ‘SIR’ वेळी तयार झालेल्या यादीत स्वतःचे, आई-वडिलांचे किंवा आजी-आजोबांचे नाव होते का, याबाबतची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले होते. या अटींमुळे नवमतदारांमध्ये मोठा भ्रम आणि वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा – कर्करोगावरचे 2,700 रुपयांचे औषध 27,000 रुपयांना? खासगी रुग्णालयांच्या मनमानी नफेखोरीवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

मतदार नोंदणी नियम 1960 लागू; अर्जाची प्रक्रिया झाली अधिक सोपी

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या भागात ‘SIR’ ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथे मतदार नोंदणी नियम, 1960 अंतर्गत मंजूर केलेला मूळ आणि नेहमीचाच फॉर्म वापरला जाईल. अतिरिक्त ‘SIR’ घोषणापत्राची अट रद्द झाल्यामुळे आता नवीन मतदारांना नाव नोंदणी करताना अनावश्यक कागदपत्रांची अडचण भासणार नाही. या निर्णयामुळे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांना नाव नोंदवणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version