Amit Shah On Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर राष्ट्रीय राजधानीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सलग दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. या घटनेत सहभागी प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा अमित शहा यांनी दिला आहे. अमित शहा यांनी सांगितले की, स्फोटामागील आरोपींना अटक करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, या कटाचे मूळ शोधून काढा आणि दोषींना न्याय मिळवून द्या. या बैठकींना गृह सचिव, एनआयए प्रमुख, आणि इतर तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनीही ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.
गृहमंत्रालयाने स्फोटाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवली आहे. यावरून केंद्र सरकारने हा स्फोट दहशतवादी कृत्य म्हणून मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण एनआयए फक्त दहशतवादाशी संबंधित प्रकरणांची चौकशी करते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवला असून, राजधानीतील अनेक ठिकाणी छापे सुरू आहेत. स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, स्फोट झालेल्या कारचा चालक फरीदाबाद येथील दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याचा संशय आहे.
Chaired review meetings on the Delhi car blast with the senior officials. Instructed them to hunt down each and every culprit behind this incident. Everyone involved in this act will face the full wrath of our agencies. pic.twitter.com/8UO2PYCvoh — Amit Shah (@AmitShah) November 11, 2025
हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड डॉ. उमरचा मृत्यू; पोलिसांनी घेतला आईचा DNA नमुना
गृहमंत्री शहा यांनी बैठकीचा समारोप करताना पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, ‘दहशतवादाविरुद्ध भारत सरकार शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन ठेवते. या कृत्यातील प्रत्येक दोषीला न्यायालयीन शिक्षेपासून कोणीही वाचू शकणार नाही.’