Chaitanyanand Saraswati : बनावट पासपोर्ट, खोटे कार्ड आणि कोट्यवधींचा घोटाळा; चैतन्यानंद सरस्वती पोलिसांच्या तावडीत

स्वयंघोषित धर्मगुरू चैतन्यानंद सरस्वतीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे दोन बनावट पासपोर्ट, युनायटेड नेशन आणि BRICS संस्थांचे खोटे कार्ड तसेच कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे पुरावे मिळाले.

Chaitanyanand Saraswati : बनावट पासपोर्ट, खोटे कार्ड आणि कोट्यवधींचा घोटाळा; चैतन्यानंद सरस्वती पोलिसांच्या तावडीत

स्वयंघोषित धर्मगुरू चैतन्यानंद सरस्वती अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. बनावट कागदपत्रे, दोन पासपोर्ट, लाखोंचे व्यवहार आणि विद्यार्थिनींवरील शोषण अशा अनेक गंभीर आरोपांनी वेढलेल्या या बाबाचा मोठा घोटाळा उघड झाला आहे.

सन 1998 मध्ये दिल्लीच्या उपराज्यपालांनी वसंतकुंज येथे शारदा पीठाला एक प्लॉट मंजूर केला होता. काही मर्यादित कामांसाठी बाबाला मठाचा अॅटर्नी बनवण्यात आले होते. याच अधिकाराचा गैरवापर करून त्याने फसवणुकीचा डाव रचला. चौकशीत समोर आले की, फर्जी दस्तावेजांच्या आधारे मठात तब्बल 40 कोटी रुपयांचा घपला करण्यात आला. एवढेच नव्हे तर, परवानगी न घेता मठाची मालमत्ता भाड्याने देण्यात आली.

चैतन्यानंदकडे दोन वेगवेगळ्या नावाने बनवलेले पासपोर्ट आढळले. एका पासपोर्टमध्ये वडिलांचे नाव स्वामी घनानंद पुरी, तर दुसऱ्यामध्ये दयानंद सरस्वती लिहिलेले होते. जन्मस्थानही दोन वेगवेगळ्या राज्यांत दाखवण्यात आले होते. त्याचे बँक खाते सुद्धा दोन भिन्न नावाने चालवले जात होते. याशिवाय, त्याच्याकडे युनायटेड नेशन आणि BRICS या संस्थांचे बनावट व्हिजिटिंग कार्ड होते. एका कार्डवर तो स्वतःला कायमस्वरूपी राजदूत, तर दुसऱ्यावर स्पेशल एनव्हॉय म्हणून दाखवत होता.

पोलिसांनी सांगितले की, फरारीच्या काळात तो वृंदावन, आग्रा, मथुरा परिसरात राहत होता आणि 15 हून अधिक हॉटेल बदलली. प्रभाव दाखवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे नाव वापरत होता. अखेर गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी त्याला आग्र्यात अटक केली.

या बाबावर दिल्लीतील एका खासगी संस्थेतील 17 विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. तो मुलींना उशिरा रात्री आपल्या खोलीत बोलवत असे, आक्षेपार्ह संदेश पाठवत असे आणि मोबाईलद्वारे त्यांच्यावर नजर ठेवत असे. पोलिसांनी संबंधित बँक खात्यांतील आठ कोटी रुपयांवर आधीच रोक लावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number