सध्या विमान प्रवासादरम्यान वाढत्या अपघातांची सत्रे सुरुच आहेत. अशातच हैदराबादवरून हुबळीकडे निघालेल्या फ्लाय91 एअरलाइन्सची फ्लाइट IC3401 चा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान तब्बल 4 तास हवेतच घिरट्या घालत होत. मात्र यादरम्यान विमानातील प्रवाशाचा जीव त्यांच्या मुठीत आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 च्या सुमारास हैदराबाद राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून निघालेले फ्लाय91 हे विमान सायंकाळी 4.30 च्या सुमारास हुबळी एअरपोर्टवर लँड करणार होत. तांत्रिक बिघाडामुळे पायलटला लँडिंग रद्द करावी लागली आणि तब्बल चार तास मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा येथे हे विमान हवेतच घिरट्या घेत राहिले. यावेळी मात्र विमानात बसलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने हे दृष्य भयानक वाटत आहे.
प्रवाशांची सुरक्षा आणि विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात घेत पायलटने तातडीने लँडिंग रद्द केले आणि विमान सुरक्षित उंचीवर ठेवले. यावेळी विमान डायव्हर्टकरून बंगळुरू येथील केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर सायंकाळी 7.30 च्या सुमार लॅंड करण्यात आले. या सर्व घटनेदरम्यान फ्रवासी मात्र खुप घाबरलेले पाहायला मिळाले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण सुरक्षित उतरण्याच्या आशेने बसला होता आणि चार तासांचा हा काळ एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. मात्र वेळीच पायलटनी घेतलेल्या निर्णय आणि सावधपणामुळे मोठा अपघात टळला. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले.
तर काही प्रवाशांच्या कुटुंबीयांनी नंतर फ्लाय91 एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला आणि या घटनेदरम्यान निष्काळजीपणा व संवादाच्या अभावाचा आरोप केला. मात्र, हुबळी विमानतळाचे संचालक रुपेश कुमार यांनी तांत्रिक बिघाडाचे दावे फेटाळून लावले आणि सांगितले की, लँडिंगच्या वेळी खराब हवामानामुळे विमान बंगळूरुला वळवण्यात आले. सध्या एअरलाइन्सकडून तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी सुरू आहे.
A #Fly91Airlines IC3401 (ATR turboprop AT7) flight from #Hyderabad to #Hubballi caused panic after it failed to land at its scheduled time and instead touched down in #Bengaluru nearly four hours late. The flight, which took off from Hyderabad’s Rajiv Gandhi International Airport… pic.twitter.com/1ahlEcCHKL — News9 (@News9Tweets) April 20, 2026