Kunal Shah WhatsApp CEO: इतिहासात पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या सुपुत्राकडे व्हॉट्सॲपची धुरा; 8500 कोटींच्या व्यवहारानंतर ‘क्रेड’चे कुणाल शाह होणार ग्लोबल CEO

फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'ने (Meta) भारतामधील प्रसिद्ध फिनटेक स्टार्टअप 'क्रेड'मध्ये (Cred) सुमारे 900 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 8550 कोटी रुपयांची महागुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kunal Shah WhatsApp CEO: इतिहासात पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या सुपुत्राकडे व्हॉट्सॲपची धुरा; 8500 कोटींच्या व्यवहारानंतर ‘क्रेड’चे कुणाल शाह होणार ग्लोबल CEO

Kunal Shah WhatsApp CEO: गुगल आणि मायक्रोसॉफ्टनंतर आता जगातील आघाडीचे मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सॲपची कमान एका भारतीय नेत्याच्या हाती जाणार आहे. फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'ने (Meta) भारतामधील प्रसिद्ध फिनटेक स्टार्टअप 'क्रेड'मध्ये (Cred) सुमारे 900 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 8550 कोटी रुपयांची महागुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 जून रोजी दोन्ही कंपन्यांनी या ऐतिहासिक कराराची अधिकृत घोषणा केली. या धोरणात्मक व्यवहाराचा एक भाग म्हणून, क्रेडचे संस्थापक कुणाल शाह हे व्हॉट्सॲपचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (Global CEO) म्हणून पदभार स्वीकारतील. जागतिक टेक जगताच्या इतिहासात व्हॉट्सॲपच्या सर्वोच्च पदावर एखाद्या गुजराती कुटुंबातील व्यक्तीची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईत जन्मलेले कुणाल शाह सांभाळणार जागतिक पद; विल कॅथकार्ट पायउतार
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे या मोठ्या बदलाची माहिती दिली. व्हॉट्सॲपचे विद्यमान प्रमुख विल कॅथकार्ट हे सलग 7 वर्षे या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर आपल्या पदावरून पायउतार होत आहेत. कॅथकार्ट आता मेटा समूहातच एका नवीन भूमिकेतून उत्पादनांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतील. त्यांच्या जागी येणारे कुणाल शाह हे मूळचे गुजराती कुटुंबातील असले, तरी त्यांचा जन्म आणि संपूर्ण पालनपोषण महाराष्ट्राची राजधानी मुंबईत झाले आहे. शाह यांच्या या जागतिक भरारीमुळे भारतीय स्टार्टअप जगताचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

'क्रेड'ची धुरा मितेन संपत यांच्याकडे; असा राहिलाय प्रवास
कुणाल शाह आता मेटा कंपनीत जागतिक पातळीवर मोठी जबाबदारी सांभाळणार असल्याने, त्यांनी स्थापन केलेल्या 'क्रेड' कंपनीच्या नेतृत्वातही बदल करण्यात आला आहे. क्रेडमधील कामकाज विनाअडथळा सुरू राहण्यासाठी कंपनीचे सध्याचे 'मायनस वन' एक्झिक्युटिव्ह (सीईओच्या खालोखालचे पद) मितेन संपत यांच्याकडे क्रेडची संपूर्ण धुरा सोपवली जाणार आहे. 2018 मध्ये सुरू झालेली क्रेड ही कंपनी केवळ क्रेडिट कार्ड पेमेंट पुरती मर्यादित न राहता आता पेमेंट, कर्ज सुविधा आणि मर्चंट सोल्युशन्स देणारी एक मोठी आर्थिक इकोसिस्टम बनली आहे. या कंपनीला नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) 'पेमेंट अ‍ॅग्रीगेटर'चा परवाना देखील मिळाला आहे.

हेही वाचा – Tesla Car Crash : टेस्लाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कुचकामी; 'ऑटोपायलट'ने घेतला वृद्धेचा बळी! भिंत तोडून भरधाव कार थेट घरात शिरली अन्…

फ्रीचार्ज ते व्हॉट्सॲप: कुणाल शाह यांचे स्टार्टअप विश्वातील उत्तुंग यश
कुणाल शाह यांनी यशस्वीरित्या उभा केलेला आणि त्यानंतर बाहेर पडलेला 'क्रेड' हा दुसरा मोठा स्टार्टअप ठरला आहे. यापूर्वी त्यांनी 2015 ते 2018 दरम्यान 'फ्रीचार्ज' हा डिजिटल पेमेंट आणि मोबाईल रिचार्ज प्लॅटफॉर्म तयार करून त्याची विक्री केली होती. गेल्या काही वर्षांत शाह हे भारतातील स्टार्टअप क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. केवळ स्वतःच्या कंपन्या चालवण्यापलीकडे त्यांनी देशातील शेकडो नवोदित स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांमध्ये गुंतवणूक केली आहे. भारतातील सर्वात सक्रिय 'एंजल गुंतवणूकदार' (Angel Investor) म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर आता ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number