Gold Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरांचा महाभडका; चांदी 3300 रुपयांनी महागली तर सोन्याने गाठला नवा उच्चांक; पाहा तुमच्या शहरातील दर

विशेषतः औद्योगिक मागणी आणि डॉलरच्या मूल्यातील चढउतारामुळे मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Gold Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरांचा महाभडका; चांदी 3300 रुपयांनी महागली तर सोन्याने गाठला नवा उच्चांक; पाहा तुमच्या शहरातील दर

मुंबई: जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत असून आज (8 मे 2026) रोजी आठवड्याच्या शेवटी सोने आणि चांदीच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) बाजार उघडताच चांदीच्या दरात तब्बल 3,300 रुपयांची भर पडली, तर सोन्याचे दरही 800 रुपयांहून अधिक वाढले आहेत. विशेषतः औद्योगिक मागणी आणि डॉलरच्या मूल्यातील चढउतारामुळे मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमसीएक्सवर चांदीची विक्रमी झेप आणि सोन्याची साथ

आजच्या व्यवहारात चांदीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले असून वायदा बाजारात चांदी गेल्या सत्रात 2,58,540 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, ती आज थेट 2,59,999 रुपयांवर उघडली. सुरुवातीच्या काही तासांतच चांदीने 3,271 रुपयांची वाढ नोंदवत 2,61,811 रुपयांचा टप्पा गाठला. सकाळी नऊ वाजता चांदी 2,61,063 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. दुसरीकडे, 5 जूनच्या सोन्यानेही आपली चमक वाढवत 1,53,103 रुपयांपर्यंत मजल मारली असून सकाळी नऊ वाजता सोन्याचा भाव 576 रुपयांच्या वाढीसह 1,52,837 रुपयांवर स्थिरावला होता.

सराफा बाजारात किरकोळ घसरण पण चांदी अजूनही तेजीत

एकीकडे वायदा बाजारात तेजी असताना, किरकोळ सराफा बाजारात सोन्याच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 320 रुपयांनी घसरून 1,52,680 रुपयांवर आला असून 22 कॅरेट सोन्याचा दर 300 रुपयांनी कमी होऊन 1,39,950 रुपयांवर स्थिरावला आहे. 18 कॅरेट सोन्यातही 240 रुपयांची घट होऊन तो 1,14,510 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, या घसरणीचा परिणाम चांदीवर झाला नसून किरकोळ बाजारात चांदीने 5,000 रुपयांची मोठी झेप घेत 2,75,000 रुपये प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

हेही वाचा: World Cheapest Petrol-Diesel: 1 रुपयात अडीच लिटर डिझेल आणि 2 रुपयांत पेट्रोल; 'या' देशांमधले इंधनाचे दर वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल; वाचा सविस्तर

प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर

देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या दरात तफावत दिसून येत असून दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,880 रुपये, तर 22 कॅरेटसाठी 1,40,100 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई आणि कोलकात्यात हाच दर अनुक्रमे 1,52,680 (24 कॅरेट) आणि 1,39,950 (22 कॅरेट) इतका आहे. चेन्नईत सोन्याचे भाव सर्वाधिक असून तिथे 24 कॅरेट सोने 1,53,840 रुपयांवर पोहोचले आहे. लखनऊ, कानपूर आणि जयपूरमध्ये दिल्लीप्रमाणेच दर असून पाटणा आणि इंदूरमध्येही किमती दीड लाखांच्या पुढे गेल्या आहेत.

दरवाढीमागील जागतिक आणि आर्थिक कारणे

जागतिक बाजारात डॉलरच्या मूल्यात झालेली घट आणि अमेरिका-इराण यांच्यातील संभाव्य शांती करारामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत नरमी आली आहे. याचा सकारात्मक परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाला आहे. अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, काल सराफ बाजार बंद होताना चांदी 2,61,500 रुपयांवर पोहोचली होती, तर सोन्याने 1,56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा गाठला होता. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढत असल्याने दरातील ही अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: SSC Result 2026: महाराष्ट्राच्या लेकींनी पुन्हा मारली बाजी! राज्याचा दहावीचा निकाल 92.9 टक्के; सलग दुसऱ्यांदा कोकणचा डंका, पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number