New Airlines In India : विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! देशात लवकरच झेपावणार ‘या’ 3 नवीन कंपन्यांची विमानं

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे 2026 पर्यंत देशांतर्गत हवाई वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.<br/>

New Airlines In India : विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! देशात लवकरच झेपावणार ‘या’ 3 नवीन कंपन्यांची विमानं

New Airlines In India : भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात (Aviation Sector) प्रवाशांना आता प्रवासाचे अधिक पर्याय आणि स्पर्धात्मक दर मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने तीन नवीन विमान कंपन्यांना देशात उड्डाणे सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे 2026 पर्यंत देशांतर्गत हवाई वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणत्या आहेत या 3 नवीन कंपन्या?

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अल हिंद एअर (Al Hind Air) आणि फ्लायएक्सप्रेस (FlyExpress) यांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी केले आहे. यासोबतच उत्तर प्रदेशातील शंख एअर (Shankh Air) कडे आधीच NOC उपलब्ध आहे. या तिन्ही विमान कंपन्या 2025 सालापर्यंत आपले व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची दाट शक्यता आहे.

अल हिंद एअर: ही कंपनी केरळमधील सुप्रसिद्ध 'अल हिंद ग्रुप'द्वारे चालवली जाणार आहे.
शंख एअर: ही उत्तर प्रदेशातील पहिली अनुसूचित विमान सेवा ठरणार आहे.
फ्लायएक्सप्रेस: या कंपनीचे प्रमोटर्स आणि ऑपरेशनल तपशील अद्याप गुलदस्त्यात असले तरी, त्यांना सरकारने परवानगी दिली आहे.

हेही वाचा – Akash-NG Missile Test : चीन-पाकिस्तानची झोप उडणार! ड्रोन असो वा मिसाईल, भारताचं हत्यार सर्वकाही उद्ध्वस्त करणार

इंडिगो आणि एअर इंडियाच्या 'वर्चस्वाला' बसणार लगाम

सध्या भारताच्या देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेवर इंडिगो (Indigo) आणि एअर इंडिया (Air India Group) यांचे अक्षरशः राज्य आहे. एकूण बाजारपेठेचा 90 टक्के भाग या दोनच कंपन्यांकडे असून, एकट्या इंडिगोचा वाटा 65 टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे प्रवाशांकडे मर्यादित पर्याय होते. मात्र, नवीन कंपन्यांच्या प्रवेशामुळे ही मक्तेदारी मोडीत निघणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा मिळतील.

हेही वाचा – Kerala Accident : डॉक्टर नव्हे, देवदूत! केरळमध्ये रेझर आणि स्ट्रॉच्या मदतीने रस्त्यावरच शस्त्रक्रिया

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची भूमिका

नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी स्पष्ट केले आहे की, देशातील वाढती विमान प्रवाशांची संख्या लक्षात घेता नवीन ऑपरेटर्सची गरज आहे. स्पर्धेमुळे विमान भाडे नियंत्रणात राहण्यास आणि प्रवासी सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असे मंत्रालयाचे मत आहे.

एव्हिएशन क्षेत्रासाठी 'पॉझिटिव्ह' सिग्नल

गेल्या काही वर्षांत गोफर्स्ट (GoFirst) आणि जेट एअरवेज (Jet Airways) सारख्या बड्या कंपन्या आर्थिक संकटामुळे बंद पडल्या होत्या. अशा परिस्थितीत नवीन कंपन्यांचा उदय होणे हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक सकारात्मक संकेत मानला जात आहे. सध्या बाजारात अकासा एअर, स्पाइसजेट आणि अलायन्स एअर यांसारख्या कंपन्या कार्यरत असल्या तरी, नवीन 3 खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे ही स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number