DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महागाई भत्ता मूळ 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर पोहोचला आहे.

DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

DA Hike: केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीच्या सणापूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महागाई भत्ता मूळ 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 1.15 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

वाढलेला महागाई भत्ता कधी लागू होईल?
नवीन दर 1 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकी ऑक्टोबरच्या पगारासह मिळणार आहे. या वाढीमुळे 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना मोठी मदत होणार आहे. 

हेही वाचा – Stock Market Holiday: गांधी जयंती आणि दसऱ्यानिमित्त शेअर बाजार सुरू राहणार का? जाणून घ्या

या वर्षाच्या सुरुवातीला, मार्च 2025 मध्ये, सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 2 टक्के वाढ केली होती, ज्यामुळे तो मूळ वेतन आणि पेन्शनच्या 55 टक्के पर्यंत पोहोचला. आता मंजूर केलेली 3 टक्के वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित आहे.

हेही वाचा – Online Shopping: खरा डिस्काउंट ओळखा आणि सणासुदीच्या काळात ऑनलाईन सेलमध्ये हजारो रुपये वाचवा; जाणून घ्या ट्रिक्स

महागाई भत्ता आणि महत्त्व

महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) हे पगार आणि पेन्शनचे महत्वाचे घटक आहेत. हे भत्ते कर्मचार्‍यांच्या आणि पेन्शनधारकांच्या राहणीमानाचा खर्च समायोजित करण्यासाठी आणि महागाईपासून संरक्षणासाठी दिले जातात. सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये या भत्त्यांमध्ये सुधारणा करते. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number