EPFO Members Bonus: भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ खातेधारकांच्या खात्यात चालू आर्थिक वर्षाच्या व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम शिल्लक आहे, त्यांना व्याजाच्या स्वरूपात सुमारे 46000 रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
व्याजाचे गणित: कोणाला किती फायदा?
EPFO कडून दरवर्षी जमा रकमेवर व्याजाची घोषणा केली जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही रक्कम सरसकट प्रत्येकाला 46000 रुपये मिळणार नसून ती तुमच्या खात्यातील 'बॅलन्स'वर अवलंबून असते. सरकारने चालू वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी नवीन व्याजदर जाहीर होण्याची प्रतीक्षा असून, त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची 'लॉटरी' लागण्याची चिन्हे आहेत.
तुमचा पीएफ बॅलन्स घरबसल्या कसा तपासावा?
व्याजाचे पैसे जमा झाले की नाही, हे तुम्ही खालील दोन सोप्या पद्धतींनी तपासू शकता:
1. ईपीएफओ पोर्टलद्वारे (EPFO Portal):
अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करा.
मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
लॉगिन झाल्यानंतर 'Passbook Lite' विभागात जाऊन तुमचे पासबुक डाऊनलोड करा. तिथे तुम्हाला व्याजाची सविस्तर माहिती दिसेल.
हेही वाचा - Expected Changes Budget 2026: कष्टाच्या कमाईवर आता कमी टॅक्स; बजेटमध्ये नोकरदारांच्या 'या' प्रमुख मागण्या पूर्ण होणार?
2. उमंग ॲपद्वारे (UMANG App):
उमंग ॲपमध्ये लॉगिन करून सर्च बारमध्ये 'EPFO' टाईप करा.
'View Passbook' वर क्लिक करून तुमचा UAN नंबर टाका.
ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचा 'मेंबर आयडी' निवडा आणि पासबुक तपासा.
बोनस मिळवण्यासाठी काय आवश्यक?
तुमच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम वेळेवर जमा होण्यासाठी तुमचा UAN नंबर आधारशी लिंक असणे आणि KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. व्याजाची ही मोठी रक्कम थेट तुमच्या पीएफ खात्यात जमा केली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.