नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिवाळीनिमित्त दिल्ली-एनसीआरमध्ये हिरवे फटाके फोडण्यास परवानगी दिली. परंतु मर्यादित वेळेत फटाके वाजवण्याची अट घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सकाळी 6 ते 7 आणि त्यानंतर रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
“तात्पुरते उपाय म्हणून, आम्ही 18 ते 21 ऑक्टोबरपर्यंत फटाके फोडण्याची परवानगी देतो. दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके तस्करी केले जातात. ते पर्यापरणपूरक फटाक्यांपेक्षा जास्त नुकसान करतात,” असे भारताचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांनी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवरील संपूर्ण बंदी शिथिल करण्याचा आदेश वाचताना सांगितले. “आपल्याला संतुलित दृष्टिकोन ठेवावा लागेल, पर्यावरणाशी तडजोड न करता संयतपणे परवानगी द्यावी लागेल,” असे ते पुढे म्हणाले.
हेही वाचा : मुलाचा बापाच्या मांडीवर जीव गेला; दुःख सहन न झाल्यानं वडिलांचाही हार्टअटॅकनं मृत्यू
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की, क्यूआर कोड असलेले प्रमाणित पर्यावरणपूरक फटाके केवळ नियुक्त ठिकाणीच विक्री आणि फोडण्यास परवानगी असेल. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. न्यायालयाने पोलिसांना फटाके उत्पादकांची नियमित तपासणी करण्यासाठी गस्त पथके स्थापन करण्याचे आणि त्यांचे क्यूआर कोड वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्ली-एनसीआर बाहेरील कोणतेही फटाके या प्रदेशात विकले जाऊ शकत नाहीत. तसे आढळल्यास विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले जातील. सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) 14 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचे निरीक्षण करेल आणि त्यानंतर सीपीसीबी आणि इतर एनसीआर प्रदूषण नियंत्रण मंडळांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 10 ऑक्टोबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारने उत्सवाच्या काळात राजधानी क्षेत्रात हिरव्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकांवर आपले आदेश राखून ठेवले होते.
हेही वाचा : Guardian Minister of Gondia: बाबासाहेब पाटलांनी दिला गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा, इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री
केंद्राच्या प्रस्तावात दिवाळी, ख्रिसमस आणि गुरुपूर दरम्यान मर्यादित सवलतीचा समावेश होता. ज्यामध्ये फटाक्यांचा वापर विशिष्ट कालावधीसाठी मर्यादित होता. उदाहरणार्थ, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री 11.55 ते 12.50 दरम्यान. या वर्षी जुलैमध्ये, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) राष्ट्रीय राजधानी प्रदेशात सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक, विक्री आणि फोडण्यावर वर्षभर बंदी जाहीर केली होती, ज्याचा उद्देश शहरातील सततच्या वायू प्रदूषणाच्या समस्येला तोंड देणे, विशेषतः दिवाळीनंतर.
DPCC च्या घोषणेच्या फक्त चार महिने आधी, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-NCR मध्ये हिरव्या फटाक्यांसह फटाक्यांवर वर्षभराची संपूर्ण बंदी घातली होती. 2024 मध्ये, दिल्लीतील तत्कालीन आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने फटाक्यांवर अशीच एकंदर बंदी घातली होती. त्यावेळी भाजपने या बंदीला तीव्र विरोध केला होता आणि ते दिल्लीकरांच्या भावनांविरुद्ध असल्याचे म्हटले होते. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आश्वासन दिले होते की, जर भाजपने दिल्लीत सरकार स्थापन केले तर ही बंदी उठवली जाईल.