प्रसिद्ध खान सर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर रात्री उशिरा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील खान सर त्यांच्या ऑनलाईन टिचिंमुळे प्रसिद्ध आहेत. पाटण्यातील मुसल्लहपुर हाट परिसरात अज्ञात लोकांनी खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर केला. यावेळी हल्लेखोरांनी 5 ते 6 राउंड गोळीबार केला असून या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एवढचं नव्हे तर हल्लेखोरांनी 2 दिवसांत कोचिंग क्लास उडवून देण्याची धमकी दिली.
तसेच सुरक्षारक्षकालाही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून खान सर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांच्या शेजारच्या कोचिंग सेंटरच्या चालकांवर हे कृत्य घडवून आणल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटणा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.