Indian Visa Cancelled: भारतीय प्रोफेशनल्सना अमेरिकेचा ‘शॉक’! हजारो व्हिसा अपॉइंटमेंट्स रद्द; नोकऱ्याही धोक्यात?

या नव्या तपासणी प्रक्रियेमुळे भारतात 15 डिसेंबरनंतर नियोजित असलेले सर्व H-1B व्हिसा इंटरव्ह्यू तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.

Indian Visa Cancelled: भारतीय प्रोफेशनल्सना अमेरिकेचा ‘शॉक’! हजारो व्हिसा अपॉइंटमेंट्स रद्द; नोकऱ्याही धोक्यात?

अमेरिकेत (USA) कार्यरत असलेल्या हजारो भारतीय प्रोफेशनल्ससमोर (Indian Professionals) मोठी अडचण उभी राहिली आहे. H-1B व्हिसा (H-1B Visa) नूतनीकरणासाठी भारतात आलेल्या उमेदवारांच्या आधीच ठरवलेल्या इंटरव्ह्यू अपॉइंटमेंट्स (Interview Appointments) अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात ज्यांचे इंटरव्ह्यू ठरले होते, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक महिन्यांनंतरच्या तारखा देण्यात आल्या असून काही प्रकरणांत नव्या तारखा थेट ऑक्टोबर 2026 पर्यंत ढकलण्यात आल्या आहेत.

या अचानक बदलामुळे अनेक जणांची नोकरी, कुटुंबीयांची व्यवस्था आणि भविष्यातील नियोजन पूर्णपणे अडचणीत आले आहे. अमेरिकन प्रशासनाने व्हिसा प्रक्रियेत (Visa Process) अधिक कडकपणा आणल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अहवालांनुसार, आता उमेदवारांची बॅकग्राउंड तपासणी (Background Verification) आणि सोशल मीडिया पडताळणी (Social Media Verification) अधिक सखोल पातळीवर केली जात आहे.

या नव्या तपासणी प्रक्रियेमुळे भारतात 15 डिसेंबरनंतर नियोजित असलेले सर्व H-1B व्हिसा इंटरव्ह्यू तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. अमेरिकन दूतावासाने (US Embassy) स्पष्ट केले आहे की ज्यांना नवीन तारीख देण्यात आली आहे, त्यांनी जुन्या अपॉइंटमेंटच्या दिवशी दूतावासात येऊ नये, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही.

हेही वाचा: Local Body Election Results 2025: नगरपरिषदांचा 'महा'फैसला; राज्याच्या मिनी मंत्रालयांवर आज कोणाची सत्ता?

या निर्णयाचा सर्वाधिक फटका त्यांना बसला आहे, जे आधीच इंटरव्ह्यूसाठी भारतात आले होते. त्यांच्या पासपोर्टवर वैध व्हिसा स्टॅम्प (Visa Stamp) नसल्याने ते अमेरिकेत परत जाऊ शकत नाहीत. परिणामी, अनेक प्रोफेशनल्सच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असून कंपन्यांनाही प्रोजेक्ट डिले (Project Delay) आणि कामकाजातील अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

फक्त H-1B नव्हे, तर इतर व्हिसा कॅटेगरींचे (Other Visa Categories) इंटरव्ह्यूही या नव्या नियमांमुळे पुढे ढकलण्यात येत आहेत. मात्र, यामुळे नेमके किती अर्जदार प्रभावित झाले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. इमिग्रेशन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्या व्हिसा स्टॅम्पिंग प्रक्रिया (Visa Stamping Process) अत्यंत अनिश्चित झाली आहे.

ह्यूस्टनस्थित (Houston) इमिग्रेशन वकील एमिली न्यूमॅन (Emily Newman) यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अपॉइंटमेंट्स रद्द केल्याने कर्मचारी आणि कंपन्या दोघांनाही मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन (Donald Trump Administration) आधीपासूनच H-1B व्हिसा प्रोग्रामबाबत कठोर भूमिका घेत असल्याचे दिसून येते. सोशल मीडिया तपासणी अधिक कडक करणे आणि H-1B व्हिसा फी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासारखे निर्णय याच धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठला! नाशिक-जळगावमध्ये हुडहुडी; पारा सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number