देशभरात नीट पेपरफुटीच्या विरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोज जनता पार्टी आणि लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन सध्या तीव्र झाले असून याचे पडसाद देशातील प्रत्येक राज्यात पाहायला मिळत आहेत. अशातच विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याऐवजी शिक्षण सचिवांची बदली करण्यात आली आहे.
गुरुवारी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रशासकीय फेरबदलाचा भाग म्हणून नरेश पाल गंगवार यांची शिक्षण मंत्रालयांतर्गत उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली. तसेच या पदावर असलेल्या विनीत जोशी यांची पंचायत राज विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याबाबत वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर झालेले हे फेरबदल उल्लेखनीय असल्याचे म्हटले जात आहेत.
दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी या बदलाचे स्वागत करत ट्वीट केले आहे. पेपरफुटीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी शिक्षण सचिवांना बदलले आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर, तसेच निष्काळजीपणा किंवा उदासीनता दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मोदी गॅरंटी” असं म्हणत निशिकांत दुबे यांनी या बदलाचे स्वागत करत या नियुक्तीला ‘मोदी गॅरंटी’ असे संबोधले आहे.
प्रधानमंत्री मोदी जी ने पेपर लीक मामले में उदासीनता बरतने वाले शिक्षा सचिव को बदल दिया । पेपर लीक के गुनहगारों सहित शिथिलता या उदासीनता बरतने वाले लोगों पर कड़ी कार्रवाई होगी । मोदी गारंटी — Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 23, 2026