Kalpita Majhi: बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर! धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी बनल्या आमदार; जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कहाणी

कालपर्यंत उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या घरी जाऊन झाडू-पोछा आणि धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी आता लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.

Kalpita Majhi: बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर! धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी बनल्या आमदार; जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कहाणी

Kalpita Majhi: घराणेशाही आणि धनशक्तीच्या जोरावर चालणाऱ्या राजकारणाला पश्चिम बंगालमध्ये एका सामान्य महिलेने जोरदार चपराक दिली आहे. कालपर्यंत उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या घरी जाऊन झाडू-पोछा आणि धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी आता लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत. औशग्राम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांनी मिळवलेला विजय हा केवळ 1 जागेचा विजय नसून, संघर्षाचा विजय मानला जात आहे.

2500 रुपयांचे मानधन अन् जिद्दीचा प्रवास
कल्पिता माझी यांची कहाणी थक्क करणारी आहे. गुस्करा नगरपालिकेतील एका छोट्या घरात राहणाऱ्या कल्पिता 4 घरांची कामे करून महिन्याला अवघे 2500 रुपये कमवत होत्या. त्यांचे पती ड्राय क्लीनर म्हणून काम करतात. गरिबीचा डोंगर समोर असतानाही कल्पिता यांनी कधीही हार मानली नाही. 2021 च्या निवडणुकीतील पराभवानंतरही त्या खचल्या नाहीत; उलट त्यांनी आपला जनसंपर्क अधिक वाढवला.

पराभवातून उभारी

2021 मध्ये पहिल्या प्रयत्नात पराभव पत्करावा लागला, मात्र कामात खंड पडू दिला नाही. यावेळी भाजपने पुन्हा विश्वास दाखवल्यावर कल्पिता यांनी प्रतिस्पर्धी श्यामा प्रसन्ना लोहार यांचा 12,535 मतांनी पराभव केला. कल्पिता यांच्या पारड्यात 1,07,692 मते पडली.

बंगालमध्ये सत्तापालट: 'दीदीं'चा गड ढासळला
कल्पिता माझी यांच्या विजयासोबतच पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. 294 जागांपैकी तब्बल 206 जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक बहुमत प्राप्त केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला केवळ 81 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.

हेही वाचा – West Bengal CM Oath Ceremony: पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, 'या' दिवशी पार पडणार मुख्यमंत्री शपथविधी सोहळा

प्रचाराचा साधा मंत्र ठरला प्रभावी
कोणताही बडेजाव किंवा गाड्यांचा ताफा न घेता कल्पिता माझी अतिशय साध्या वेशात घरोघरी फिरल्या. "मी तुमच्यातीलच एक आहे," हा त्यांचा साधेपणा मतदारांच्या मनाला भिडला. राजकारणातील 'कचरा' साफ करण्याची जिद्द घेऊन मैदानात उतरलेल्या एका कष्टकरी महिलेने आज विधानसभेचे तिकीट मिळवून देशासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number