HIV Positive Prisoners: तुरुंगांत HIV चा उद्रेक! 4 महिन्यांत 226 कैदी बाधित; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

राज्यातील 31 तुरुंगांमध्ये एप्रिल ते जुलै दरम्यान करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय तपासणी मोहिमेत तब्बल 226 कैद्यांना एचआयव्हीची (HIV) लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

HIV Positive Prisoners: तुरुंगांत HIV चा उद्रेक! 4 महिन्यांत 226 कैदी बाधित; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

HIV Positive Prisoners : आसाममधील कारागृहा प्रशासनात आणि आरोग्य विभागात सध्या एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील 31 तुरुंगांमध्ये एप्रिल ते जुलै दरम्यान करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय तपासणी मोहिमेत तब्बल 226 कैद्यांना एचआयव्हीची (HIV) लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी 202 बाधितांवर तातडीने 'अँटीरेट्रोव्हायरल थेरपी' (ART) उपचार सुरू करण्यात आले आहेत. श्रीभूमी जिल्हा कारागृहासारख्या ठिकाणी तर क्षमता केवळ 187 कैद्यांची असताना तिथे 445 कैदी कोंबण्यात आले असून, त्यातील 11 जण एचआयव्ही बाधित आढळले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, नव्याने समोर आलेल्या एचआयव्ही बाधितांपैकी 95 टक्क्यांहून अधिक कैदी हे नशील्या पदार्थांच्या (NDPS) गुन्ह्यांखाली बंदी असून, इंजेक्शनद्वारे ड्रग्ज घेण्याच्या सवयीमुळे हा संसर्ग वेगाने पसरल्याचे समोर आले आहे.

कारागृहात संसर्ग कसा पसरला?; गुवाहाटी उच्च न्यायालयाकडून दखल 

या गंभीर प्रकरणाची दखल थेट गुवाहाटी उच्च न्यायालयाने घेतली असून, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. कैद्यांना हा संसर्ग तुरुंगात येण्यापूर्वीच झाला होता की तुरुंगात आल्यानंतर काही निष्काळजीपणामुळे झाला, याचा सखोल शोध घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संसर्गग्रस्त प्रत्येक कैद्याला योग्य ते वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन पुरवण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कैद्यांना बाहेर नेणे धोक्याचे असल्याने, विशेष आरोग्य पथके थेट तुरुंगात जाऊन बाधितांना औषधोपचार पुरवत आहेत.

हेही वाचा – Subhash Chandra NCLT Repayment Plan: 99 टक्क्यांहून अधिकचे नुकसान मान्य नाही! सुभाष चंद्रा यांच्या परतफेड योजनेविरोधात 2 बँकांचे न्यायालयात अपील

कैद्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट गर्दी आणि आरोग्य व्यवस्थेपुढील आव्हान

या घटनेने आसाममधील कारागृहांच्या दुरवस्थेचा आणि तिथे असणाऱ्या अतोनात गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक कैदी एकाच ठिकाणी राहत असल्याने संसर्गजन्य आजार रोखणे कठीण होत आहे. आसामचे आरोग्यमंत्री अशोक सिंघल यांच्या माहितीनुसार राज्यात सध्या 33 हजारांहून अधिक सक्रिय एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर, उच्च धोक्याच्या श्रेणीत असलेल्या कारागृहासारख्या ठिकाणी एड्स नियंत्रण समितीच्या माध्यमातून नियमित तपासणी आणि समुपदेशन सत्रे अधिक तीव्र करण्यात येत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number