Tuesday, November 18, 2025 09:24:20 PM

Mamata Banerjee Controversial Statement: पीडिता रात्री 12:30 वाजता कशी बाहेर पडली? दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान

विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी यांनी विचारलं की, ती रात्री 12:30 वाजता कॅम्पसमधून कशी बाहेर पडली?

mamata banerjee controversial statement पीडिता रात्री 1230 वाजता कशी बाहेर पडली दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान

Mamata Banerjee Controversial Statement: पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण राज्य हादरलं असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी यांनी विचारलं की, ती रात्री 12:30 वाजता कॅम्पसमधून कशी बाहेर पडली? दरम्यान, आता याच वक्तव्यावरून विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. पण ती एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती, मग जबाबदारी कोणाची? अशा ठिकाणी प्रशासन आणि संस्थांनी ‘नाईट कल्चर’वर नियंत्रण ठेवायला हवं. विद्यार्थिनींना रात्री उशिरा बाहेर पडू देऊ नये, कारण तो परिसर जंगलासारखा आहे. त्यांच्या या विधानावरून भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली. 

हेही वाचा - P Chidambaram : “..त्यासाठी इंदिरा गांधींना स्वतःच्या जिवाची किंमत..”; ऑपरेशन ब्लू स्टारसंदर्भात चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य

पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी ‘एक्स’वर लिहिलं, 'लज्जास्पद! मुख्यमंत्री असूनही ममता बॅनर्जी पीडितेला दोष देत आहेत. न्याय देण्याऐवजी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.' भाजपने असा आरोप केला की, 'महिलांना रात्री बाहेर जाणं टाळा असं सांगणाऱ्या मुख्यमंत्री त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही करत नाही.' तथापी, ममता बॅनर्जी यांनी या टीकेला उत्तर देताना शेजारच्या ओडिशा राज्याचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, ओडिशातील समुद्रकिनाऱ्यांवर मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, पण तिथल्या सरकारने काय कारवाई केले? अशा घटना जिथे घडतील तिथे कठोर कारवाई केली जाईल. मग ते मणिपूर असो, उत्तर प्रदेश, बिहार किंवा ओडिशा. 

हेही वाचा - Chhattisgarh Shocker: प्रेयसी म्हणावं की, चेटकीण! प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रियकराला प्यायला लावलं विष; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक झालेल्यांमध्ये अप्पू बौरी (21), फिरदौस शेख (23) आणि शेख रियाझुद्दीन (31) यांचा समावेश आहे. पीडित विद्यार्थिनी ओडिशातील जलेश्वर येथील असून ती सध्या गंभीर अवस्थेत आहे. तिच्या वडिलांनी सांगितलं की, 'माझी मुलगी चालूही शकत नाही. आम्हाला आता तिच्या सुरक्षिततेवर विश्वास नाही, आम्ही तिला ओडिशाला परत नेणार आहोत.' ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी पीडितेच्या कुटुंबाशी संपर्क साधून मदतीचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणानंतर राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांचं वादग्रस्त विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 


सम्बन्धित सामग्री