Wednesday, July 09, 2025 09:40:29 PM

विमान अपघातामुळे किती कोटी रुपयांचे नुकसान होते? आकडा ऐकून व्हाल अवाक!

विमान अपघातामुळे झालेल्या नुकसानाची गणना अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यात अपघातग्रस्त विमानाची किंमत, प्रवाशांचा विमा, मालाची किंमत आणि कायदेशीर दंड यांचा समावेश आहे.

विमान अपघातामुळे किती कोटी रुपयांचे नुकसान होते आकडा ऐकून व्हाल अवाक
Ahmedabad Plane Crash
Edited Image

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाईट AI171 च्या दुर्दैवी अपघाताचा परिणाम जागतिक बाजारपेठेतही दिसून येत आहे. गुरुवारी प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये अमेरिकन विमान निर्माता कंपनी बोईंगचे शेअर्स 8% पर्यंत घसरले. अहमदाबादहून लंडनला जाणारे बोईंग 787 ड्रीमलायनर टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले. विमानात एकूण 242 प्रवासी होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, विमान अपघातामुळे झालेल्या नुकसानाची गणना अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यात अपघातग्रस्त विमानाची किंमत, प्रवाशांचा विमा, मालाची किंमत आणि कायदेशीर दंड यांचा समावेश आहे. विमानाची किंमत त्याच्या मॉडेल आणि आकारावर ठरवली जाते.

कर्मचाऱ्यांची विमा रक्कम

दरम्यान, बोईंग 787 ड्रीमलायनरची किंमत 2000 कोटी रुपये आहे. हे 2019 पर्यंत सार्वजनिक असलेल्या यादीतील किमत आहेत. त्यानंतर बोईंगने यादीतील किमती सार्वजनिक करणे बंद केले आहे. विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सवलती आणि कस्टम पॅकेजेस मिळत असल्याने प्रत्यक्ष डील किंमत सहसा खूपच कमी असते. तथापि, विमान कंपन्या सर्व प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा विमा उतरवतात. प्रति प्रवासी विमा रक्कम 1 कोटी ते 5 कोटी पर्यंत असू शकते. अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्यास, विमा कंपन्यांना मोठी रक्कम द्यावी लागते.

हेही वाचा - चरखी दादरी अपघातानंतर अहमदाबादमधील विमान अपघात ठरला देशातील सर्वात मोठा विमान अपघात

विमान कंपनीकडून आकारला जातो कायदेशीर दंड

याशिवाय, जर विमानात महागड्या वस्तूंचा (जसे की इलेक्ट्रॉनिक्स, उद्योग उपकरणे किंवा औषधे) माल असेल तर त्याचे नुकसान देखील कोट्यवधी रुपयांमध्ये असू शकते. तसेच अपघातानंतर विमान कंपनीवर कायदेशीर दंड आकारला जाऊ शकतो. जर विमान कंपनीने सुरक्षितता मानकांचे पालन केले नाही तर कंपनीला लाखो आणि कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, विमान अपघातामुळे ब्रँड इमेजला नुकसान होते. ज्यामुळे विमान कंपनीला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी कोण करणार? काय आहेत नियम? जाणून घ्या

तथापि, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रत्येक प्रवाशाला किमान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते. ही भरपाई प्रवाशांच्या कुटुंबाला दिली जाते. तथापि, विमान कंपन्या त्यांच्या विमानाचा विमा उतरवतात. यामध्ये विमानाची दुरुस्ती किंवा पुनर्निर्मिती देखील समाविष्ट आहे. भारतात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विमान अपघातांची चौकशी करते.
 


सम्बन्धित सामग्री