पाकड्यांचा कायमचा इलाज कसा करायचा ?

पाकवर लष्करी कारवाई करणे ही प्रत्येक भारतीयाची मानसिकता आहे. मात्र, तशी कारवाई म्हणजे भेळ बनवण्या इतके सोपे काम नाही. लष्करी कारवाईची पूर्वतयारी ही कूटनैतिक मार्गाने केली जाते.

पाकड्यांचा कायमचा इलाज कसा करायचा ?

नवी दिल्ली : पाकवर लष्करी कारवाई करणे ही प्रत्येक भारतीयाची मानसिकता आहे. मात्र, तशी कारवाई म्हणजे भेळ बनवण्या इतके सोपे काम नाही. लष्करी कारवाईची पूर्वतयारी ही कूटनैतिक मार्गाने केली जाते. तशी पावले भारताने टाकायला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही थेट लष्करी कारवाई टाळून पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा भारताचा प्रयत्न आजतरी दिसत आहे. 

भारतीय नौदलाने आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आयएनएस सुरत या स्वदेशी बनावटीच्या विनाशिकेतून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमध्ये क्षेपणास्त्राने समुद्रातील लक्ष्यावर अचूक वेध घेतला, अशी माहिती नौदलाच्या अधिकार्‍यांनी दिली. या यशामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ झाली असून, स्वदेशी युद्धनौका निर्माण करण्याच्या दिशेने भारताने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा : 'पाकड्यांचा होणार कायदेशीर इलाज'

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदू कोण, मुसलमान कोण ?, प्रश्न विचारत पर्यटकांना वेगळं केलं.असे संजय लेलेंच्या पत्नीनं सांगितलं. यामुळे दहशतवाद्यांचं क्रौर्य लक्षात आलं आहे. अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांच्या मृत्यूने डोंबिवलीवर शोककळा पसरली आहे. यामुळेच गुरुवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. 

पाकिस्तानकडून अरबी समुद्रात गोळीबाराचा सराव
भारताच्या प्रत्युत्तराची भीती बाळगून पाकिस्तानने अरबी समुद्रात गोळीबाराचा सराव सुरू केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा, अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा, सार्क व्हिसा योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना मिळणारी सूट संपवण्याचा आणि दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयांमधील कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यानंतर पुढचे पाऊल सर्जिकल स्ट्राईक असू शकते का अशी अटकळ बांधली जात आहे.

पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही. भारताने पाकड्यांची कोंडी करताच शेफाली कसुरीने कांगावा केला आहे. व्हिसा बंद केल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांसोबत संपर्क ठेवता येणार नाही असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे. शैलेश कल्थिया यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसआधी त्यांची हत्या झाली आहे. अतिरेकी हल्ल्यात सुरतच्या शैलेश कल्थियांची हत्या झाली. तर दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटेंच्या हत्या झाली. यानंतर पुण्यात गुरुवारी त्यांच्या अंत्यसंस्काराला शरद पवार उपस्थित राहिले. यावेळी पवारांसमोर गणबोटेंनी कैफियत  मांडली. अतिरेक्यांच्या इस्लामी अन्यायाची  कहाणी त्यांनी सांगितली. जम्मू-काश्मीरच्या पाल गावात अडकलेलं ठाकूर दाम्पत्य मुंबईत परतलं. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दाम्पत्याने केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number