Sunday, November 16, 2025 06:33:51 PM

Air India: 'एअर इंडिया 787 ची सर्व उड्डाणे तात्काळ बंद करा'; वैमानिक संघटनेने अशी मागणी का केली? जाणून घ्या

तसेच संघटनेने सर्व विमाने तात्पुरते थांबवण्याची मागणी करत, विशेष ऑडिट करण्याची विनंती डीजीसीएकडे केली आहे.

air india एअर इंडिया 787 ची सर्व उड्डाणे तात्काळ बंद करा वैमानिक संघटनेने अशी मागणी का केली जाणून घ्या

Air India: एअर इंडियाच्या विमानांमध्ये अलिकडच्या काळात घडलेल्या तांत्रिक समस्यांमुळे फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) ने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून सर्व 787 विमान तातडीने तपासण्याची मागणी केली आहे. तसेच संघटनेने सर्व विमाने तात्पुरते थांबवण्याची मागणी करत, विशेष ऑडिट करण्याची विनंती डीजीसीएकडे केली आहे. 787 विमानांच्या सुरक्षित आणि सुरळीत ऑपरेशनसाठी वैमानिक संघटनेने सरकारसमोर तीन मागण्या मांडल्या आहेत.

एफआयपीचे अध्यक्ष कॅप्टन सीएस रंधावा यांनी 10 ऑक्टोबरच्या पत्रात नमूद केले की, एका आठवड्यात एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. त्यांनी पत्रात लिहिले की अमृतसरहून बर्मिंगहॅमला जाणारी फ्लाइट एआय-117 आणि व्हिएन्नाहून दिल्लीला जाणारी फ्लाइट एआय-154 मध्ये तांत्रिक समस्या आल्या. ते म्हणाले की विमानात कमी कालावधीसाठी विद्युत बिघाड होण्याच्या घटना सेवाक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वैमानिक संघटनेच्या मते, दोन्ही प्रकरणांमध्ये ऑटोपायलट, इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS), फ्लाइट डायरेक्टर्स (FDs) आणि फ्लाइट कंट्रोल सिस्टम मध्ये बिघाड झाला, ज्यामुळे विमानाची ऑटोलँडिंग क्षमता प्रभावित झाली.

हेही वाचा - Donald Trump: चीनच्या शत्रुतापूर्ण निर्णयावर ट्रंप यांचा इशारा; म्हणाले, 'व्यापारात हस्तक्षेप केला तर...

रॅम एअर टर्बाइन म्हणजे काय?

रॅम एअर टर्बाइन हे विमानाच्या बाहेर असलेले लहान उपकरण आहे, जे मुख्य इंजिन किंवा इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये अडचण आल्यास उघडते. हे विमानाच्या हायड्रॉलिक्स, नेव्हिगेशन आणि कंट्रोल सिस्टमना तात्पुरती ऊर्जा पुरवते. याचे आपोआप उघडणे अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते.

हेही वाचा - Reliance Power: अंबानी ग्रुपला धक्का! 68 कोटींच्या फसवणुकीत सहाय्यक अशोक पाल ED च्या ताब्यात

एअर इंडियाची प्रतिक्रिया

दरम्यान, टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने म्हटलं आगे की, एआय-117 वर RAT उघडणे अनकमांड घटना होती. यामुळे कोणताही धोका उद्भवला नाही. सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक सिस्टम सामान्य स्थितीत होत्या आणि विमान बर्मिंगहॅममध्ये सुरक्षित उतरले. विमान तात्पुरते तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले होते आणि नंतर पुन्हा ऑपरेशन सुरू झाले.


सम्बन्धित सामग्री