अनेकदा नियमांच्या नावाखाली काही पोलीस गुंडागर्दी करताना पाहायला मिळतात. अशावेळी ते त्यांच्या समोर महिला आहे की, वृद्ध याचा कसलाच विचार न करता असे काही पोलीस सामान्य नागरिकांवर मुजोरी करताना अनेकदा दिसून येतात. असाच एक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबाद येथे एक ट्रॅफिक पोलिस तावातावात आला आणि त्याने समोर उभी असलेल्या दुचाकीस्वार महिलेच्या कानशिलात लगावली. त्या ट्रॅफिक पोलिसाच्या या गैरवर्तनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अहमदाबादमधील अंजली चौकातून महिला दुचाकीवरून जात असताना तिने ट्रॅफिक सिग्नल मोडला होता. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी तिला थांबवले आणि ट्रॅफिक सिग्नल मोडल्यामुळे तिच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. त्यानंतर पोलीस आणि त्या महिलेत वाद निर्माण झाला. त्यामुळे संतापाच्याभरात महिलेने ट्रॅफिक पोलिसाचा आयडी कार्ड खेचून जमिनीवर फेकला.
महिलेच्या या कृत्यावर पोलिसाने देखील रागात महिलेच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित ट्रॅफिक पोलिसाला तात्काळ निलंबित केले आहे. तसेच त्या पोलिसावर अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली संबंधित महिलेवर एन डिव्हिजन ट्रॅफिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
More videos surface including a bodycam footage in -police man slapping a two-wheeler rider woman row – in Ahmedabad. Fresh videos show the other side of coin, including signal jump offense, no helmets, Advocate sticker (another breach of law) on two-wheeler, throwing of ID card… pic.twitter.com/1RySt5rRYm — DeshGujarat (@DeshGujarat) December 20, 2025