‘भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र’; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केले निवेदन

तहव्वुर राणा 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहणार आहे. राणाच्या चौकशीदरम्यान मोठे खुलासेही होऊ शकतात. तहव्वुर राणा याला भारतात प्रत्यार्पण करण्यावर अमेरिकेतूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे.<br/>

‘भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र’; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केले निवेदन
Edited Image

नवी दिल्ली: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याला गुरुवारी भारतात आणण्यात आले आहे. आता एनआयए त्याची चौकशी करणार आहे. तहव्वुर राणा 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहणार आहे. राणाच्या चौकशीदरम्यान मोठे खुलासेही होऊ शकतात. तहव्वुर राणा याला भारतात प्रत्यार्पण करण्यावर अमेरिकेतूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, '2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या नियोजनात त्याच्या भूमिकेबद्दल त्याला न्याय मिळावा म्हणून अमेरिकेने तहव्वुर हुसेन राणा याला भारताकडे प्रत्यार्पण केले. या हल्ल्यांमध्ये सहा अमेरिकन लोकांसह 166 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेने दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे, दहशतवादाच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत राहतील,' असंही टॅमी ब्रूस यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा – Tahawwur Rana : लँडिंगनंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आला समोर; आता फासावर लटकणार की तुरुंगात सडणार?

दरम्यान, या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्याची पुष्टी करताना म्हटले होते की, राणा न्यायाला सामोरे जाण्यासाठी भारतात परत जात आहे. डिसेंबर 2019 मध्ये भारताने अमेरिकेला राणा यांना ताब्यात देण्याची विनंती केली होती.

हेही वाचा – Tahawwur Rana Extradited: तहव्वुर राणा 2011 पासून मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल

तहव्वुर राणा 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहणार आहे. या दरम्यान राणाला मुंबई हल्ला, डेव्हिड कोलमन हेडली आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित 30 प्रश्न विचारले जाऊ शकतात. दहशतवादी राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएने अमेरिकेत मोठी कायदेशीर लढाई लढली आहे. अनेक वर्षांच्या सततच्या प्रयत्नांनंतर एनआयएने दहशतवादी राणाचे अमेरिकेतून प्रत्यार्पण सुनिश्चित केले. त्यानंतर त्याला विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number