केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला म्हणजे आज देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याकडे देशातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
आयकर
काही करदाते अजूनही जुन्या कररचनेचा वापर करत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून 12 लाखांपर्यंतची करसवलत 14 लाख करावी अशी मागणी केली जातेय.
टीडीएस कपात
ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा 50 हजार रुपयांवरुन 1 लाख रुपये केल होती. घरभाड्यातून मिळणाऱ्या कमाईवरील मर्यादा 2.40 लाखांवरुन 6 लाख केली होती. ज्येष्ठ नागरिकांची टीडीएस कपातीच मर्यादा 1 लाखांवरुन 2 लाख करावे, अशी मागणी केली जातेय.
जुनी कररचना
नव्या कररचनेनुसार 12 लाख रुपयांपर्यंत कर सवलत देण्यात आली आहे. सध्या बेस कर सवलत मर्यादा 2.5 लाख रुपये आहे. मात्र सेक्शन 87 अ नुसार कर रिबेट दिला जातो. त्यामुळं वार्षिक कमाईवरील करसवलत 5 लाख रुपये होते. ती 8 लाख करण्याची मगणी केली जातेय.
NPS बद्दल कोणती मागणी
एनपीएस सूट नव्या कररचनेत घेऊन 80 टक्के रक्कम काढण्यावर शून्य टक्के कर लावावा, अशी मागणी केली जातेय.
GST सुधारणा
केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी जीएसटी कररचनेत बदल केला आहे.शिक्षण, लघू उद्योग, रिअल इस्टेटमध्ये सूट देण्याची मागणी होती.
विमा क्षेत्र
विमा क्षेत्र 0 टक्के जीएसटीमध्ये ठेवणे आणि 100 टक्के विदेशी गुंतवणुकीला मान्यता मिळाल्यानंतर विमा आणि आरोग्य विमा गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देऊ शकते.
सोनं-चांदी
सोनं चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली दिसून येत आहे. चांदीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.सोनं दीड लाखांच्या पार पोहोचलं आहे. सोने आणि चांदीवर लावण्यात येणारं आयात शुल्क कमी करावं, जीएसटी दरात कपात करावी, अशी मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
पीएम किसान सन्मानची सध्याची रक्कम 6000 रुपये आहे, ती वाढून 12000 हजार होण्याची अपेक्षा आहे.
शेअर बाजाराच्या अपेक्षा
विदेशी गुंतवणूकदारांना बाजारात परत येण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा असावी अशी अपेक्षा आहे. तसेच एलटीसीजी आणि एसटीसीजी आणि एसटीटी मध्ये कपातीची मागणी केली जाते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी काय?
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये सवलत दिली जायची. ती सेवा बंद आहे. ती सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली जातेय.