Sunday, February 08, 2026 12:48:33 AM

पाकिस्तानकडून LOC वर पुन्हा गोळीबार; सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन

भारताच्या भितीनं घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवायला घेतलं आहे.

पाकिस्तानकडून loc वर पुन्हा गोळीबार सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली: भारताच्या भितीनं घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवायला घेतलं आहे . आधीच अर्थव्यवस्थेत कमी असलेल्या पाकिस्तानची यामुळे आणखीच जिरली आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानने सलग 11 व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून LOC वर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. 

पाकिस्तानकडून LOC लहान शस्त्रांद्वारे सतत भारताच्या दिशेने गोळीबार केला जात आहे. भारतीय सैनिकांनी  दिलेल्या माहितीनुसार, 4-5 मे रोजी रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही जशासतसं उत्तर दिलं आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनात वाढ झाली आहे, हे उल्लंघन आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही पसरले आहे. गेल्या आठवड्यापासून सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध अनेक कारवाईची घोषणा केली आहे. भारताने अटारीची महत्त्वाची सीमा वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर आणि सिंधू जल करार रद्द केल्यानंतर, पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले आणि भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले.

जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागातील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार केला.तर भारतीय लष्कराने कॅलिब्रेटेड आणि प्रमाणबद्ध पद्धतीने प्रत्युत्तर दिले.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या