नवी दिल्ली: जागतिक राजकारणात ‘मैत्री’ आणि ‘व्यापार’ यांच्या व्याख्या बदलत असताना, रशियाने भारताला दिलेल्या एका खास भेटीमुळे व्हाईट हाऊसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून रशियन तेल खरेदीचा ठपका ठेवत 50 टक्के आयात शुल्क (Tariff) लादण्याची घोषणा केली होती. भारताला आर्थिक कोंडीत पकडून रशियापासून दूर करण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न होता. मात्र, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना न जुमानता भारताने आपल्या राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी आता भारताला विमानांच्या रूपाने एक मोठी ऑफर दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प केवळ टॅरिफवरच थांबले नाहीत, तर त्यांनी व्हिसा नियमांमध्ये बदल करून भारतीयांच्या प्रवासावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचा आरोप आहे की, भारत रशियाकडून तेल विकत घेऊन युक्रेन युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक बळ पुरवत आहे. या दबावामुळे गेल्या काही महिन्यांत भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी काही प्रमाणात कमी केली असली, तरी त्यामागे अमेरिकेचा धाक नसून दोन्ही देशांत सुरू असलेली एक महत्त्वाची व्यापारी चर्चा कारणीभूत आहे. मात्र, अमेरिकेच्या या अरेरावीमुळे भारताने आपली व्यापाराची दिशा बदलली असून आता रशिया आणि चीनसोबतची भारताची निर्यात विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.
हेही वाचा: Nashik News : नाशिककरांची डोकेदुखी वाढणार! महत्त्वाच्या मार्गांवर 19 एप्रिलपर्यंत 'नो एन्ट्री', कारण काय?
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतावर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही, उलट अमेरिकेलाच आपली मोठी बाजारपेठ गमवावी लागते की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंधांना एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. या दौऱ्यात पुतिन यांनी भारताला केवळ संरक्षण क्षेत्रातच नव्हे, तर नागरी विमान वाहतूक क्षेत्रातही (Civil Aviation) स्वावलंबी करण्यासाठी दोन आधुनिक विमानांची ऑफर दिली आहे. रशियन तंत्रज्ञानाने सज्ज असलेली Superjet-100 आणि Il-114-300 ही विमाने आता भारताच्या आकाशात झेपावण्यासाठी सज्ज आहेत.
यातील सर्वात लक्षवेधी आणि अमेरिकेला आग लावणारी बाब म्हणजे रशियाच्या ‘सुपरजेट-100’ विमानाच्या अंतर्गत भागात (Interior) कोरलेली भारताच्या तिरंग्याची प्रतिकृती! रशियाने हे पाऊल उचलून केवळ व्यापारच नव्हे, तर भारताच्या अस्मितेचा सन्मान केल्याचा संदेश दिला आहे. “संकटात जो कामाला येतो, तोच खरा मित्र,” हे रशियाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ज्या वेळी अमेरिका टॅरिफचा धाक दाखवत होती, त्याच वेळी रशियाने भारतीयांच्या सर्वात प्रिय गोष्ट म्हणजेच तिरंग्याची विमानात प्रतिष्ठापना करून भारतीयांची मने जिंकली आहेत.
हे विमान केवळ प्रवासी वाहतूक करणार नाही, तर ते रशियन इंजिन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय विमान वाहतूक उद्योगाला एक नवी गती देणार आहे. अमेरिकन कंपन्यांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी रशियाने टाकलेली ही खेळी जागतिक राजकारणात भारताचे पारडे जड करणारी ठरली आहे. पुतिन यांची ही ‘इमोशनल’ आणि ‘स्ट्रॅटेजिक’ खेळी पाहून अमेरिकन प्रशासनाला आता आपली चूक उमजली असावी, कारण भारताने हे दाखवून दिले आहे की, कुठल्याही देशाच्या दबावाखाली येऊन व्यवहार करणारा देश नाही.
हेही वाचा: CBSE Exam Admit Card: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; CBSE हॉल तिकीट 'या' लिंकवर होणार उपलब्ध, डाउनलोड करण्याची सोपी पद्धत पाहा