Bangladesh Boats Seized: उत्तर बंगालच्या उपसागरात भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई करत बांगलादेशच्या तीन मासेमारी बोटी जप्त केल्या असून एकूण 79 क्रू सदस्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) अनधिकृत मासेमारी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
भारतीय EEZ मध्ये बेकायदेशीर घुसखोरी
नियमित सागरी गस्तीदरम्यान तटरक्षक दलाच्या जहाजांनी भारताच्या EEZ मध्ये बांगलादेशी नौका मासेमारी करताना आढळल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कृती भारतीय सागरी क्षेत्र (विदेशी जहाजांद्वारे मासेमारीचे नियमन) कायदा, 1981 चे उल्लंघन आहे.
हेही वाचा- America Saudi Arabia Deal: आधी थेट नकार, मग अचानक हिरवा कंदील! सौदी–अमेरिका डीलमुळे भारताला मोठा धक्का
तपासात काय निष्पन्न झाले?
तटरक्षक दलाने बोटी अडवल्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये कोणत्याही क्रू सदस्याकडे भारतीय पाण्यात मासेमारीसाठी आवश्यक परवाना किंवा परवानगी नव्हती. बोटींतून मोठ्या प्रमाणात मासेमारीचे जाळे, उपकरणे आणि ताजे मासे जप्त करण्यात आले. यावरून बेकायदेशीर मासेमारी झाल्याचे पुरावे स्पष्टपणे समोर आले आहेत. तटरक्षक दलाने तीनही बोटींना ताब्यात घेत त्यांना पश्चिम बंगालमधील फ्रेझरगंज येथे आणले.
हेही वाचा- Pregnent Women Accident : भारतीय महिलेचा सिडनीत मृत्यू, रस्ता क्रॉस करताना 'बीएमडब्ल्यू'ची जोरदार धडक
दरम्यान, या प्रकरणी 79 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना मरीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण आणि EEZ मधील संसाधनांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची सततची कडक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.