Luggage Lost Helpline: रेल्वे प्रवासात बॅग हरवली आहे?; घाबरू नका! ‘या’ सोप्या ट्रिकने पुन्हा मिळवा तुमची बॅग

योग्य वेळी कारवाई केल्यास हरवलेले सामान परत मिळण्याची शक्यता वाढते.

Luggage Lost Helpline: रेल्वे प्रवासात बॅग हरवली आहे?; घाबरू नका! ‘या’ सोप्या ट्रिकने पुन्हा मिळवा तुमची बॅग

रेल्वे प्रवासात दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र अनेकदा घाईगडबडीत सामान ट्रेनमध्येच राहते किंवा चोरीला जाते. अशा वेळी प्रवासी घाबरून जातात आणि पुढे काय करावे हे समजत नाही. पण भारतीय रेल्वेने (Indian Railways) यासाठी सोपी आणि प्रभावी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. योग्य पद्धतीने तक्रार केल्यास हरवलेले सामान परत मिळण्याची शक्यता वाढते.

Rail Madad अ‍ॅपद्वारे तक्रार कशी करावी?

हरवलेले सामान शोधण्यासाठी 'रेल मदद' (Rail Madad) अ‍ॅप सर्वात सोपा मार्ग आहे. सर्वप्रथम अ‍ॅप उघडून आपला PNR क्रमांक टाका. त्यानंतर हरवलेल्या वस्तूंची सविस्तर माहिती भरून तक्रार नोंदवा. अ‍ॅप वापरायचा नसेल तर Rail Madad पोर्टलवर जाऊनही ऑनलाइन तक्रार करता येते. लक्षात ठेवा, जितक्या लवकर तक्रार कराल तितक्या लवकर शोध प्रक्रिया सुरू होते.

हेही वाचा: Iran-US War Impact on Internet: समुद्राच्या तळाशी नेमकं काय शिजतंय? भारतासह जगातील इंटरनेट वापरावर टांगती तलवार, इराणने प्रसिद्ध केला 'तो' नकाशा

स्टेशनवरूनही मिळू शकते मदत

जर अ‍ॅप वापरणे शक्य नसेल, तर ज्या स्टेशनवर ट्रेन थांबली होती किंवा पुढील मोठ्या स्टेशनवर जाऊन स्टेशन मास्टर किंवा लॉस्ट प्रॉपर्टी काउंटरवर माहिती द्यावी. याशिवाय Railway Protection Force (RPF) ला माहिती देणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. सामान लगेच न सापडल्यास RPF कडे FIR नोंदवावी लागते. त्यानंतर रेल्वे संपूर्ण मार्गावर शोध मोहीम राबवते.

Rail Madad चे फायदे

या अ‍ॅपमध्ये 24 तास तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तिकीट, सुरक्षा, स्वच्छता अशा विविध समस्यांवरही येथे उपाय मिळतो. तक्रार केल्यानंतर तिची स्थिती ट्रॅक करता येते आणि फीडबॅक देण्याची सुविधाही दिली आहे.

योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तक्रार केल्यास हरवलेले सामान परत मिळण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे अशा परिस्थितीत घाबरून न जाता त्वरित कारवाई करणेच सर्वात महत्त्वाचे आहे. 

हेही वाचा: Gold Silver Rate Today: सण-समारंभाच्या तोंडावर सोन्याचे भाव कडाडले; पाहा प्रमुख शहरातील आजचे दर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number