पटना: प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी आणि Digital Ticketing ला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे कडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. RailOne Mobile App च्या माध्यमातून Unreserved Ticket Booking केल्यास आता प्रवाशांना 3 टक्के विशेष सवलत (Discount) दिली जाणार आहे. ही सवलत 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीत लागू राहणार आहे.
पूर्व मध्य रेल्वे क्षेत्रात RailOne App ची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, 14 ते 19 जानेवारी या अवघ्या पाच दिवसांत RailOne App च्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक प्रवाशांनी तिकिटे बुक केली आहेत. यामधून पूर्व मध्य रेल्वेला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पूर्व मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, भविष्यात अशा Digital Facilities अधिक मजबूत केल्या जाणार असून, प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीचा रेल्वे प्रवास देण्यावर भर दिला जाणार आहे. डिजिटल माध्यमांचा वापर वाढल्यास तिकिट बुकिंग प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: BJP - Shivsena Alliance: मोठी बातमी; जिल्हा परिषदेसाठी भाजप-शिवसेना एकत्र, मात्र या ठिकाणी भाजपचा 'स्वबळाचा' नारा?
RailOne App वर R Wallet वगळता इतर सर्व डिजिटल पेमेंट माध्यमांद्वारे UPI (Unified Payments Interface), Debit Card, Credit Card आणि Net Banking द्वारे तिकीट बुक केल्यास प्रवाशांना थेट 3 टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत तिकिटाच्या किमतीतून थेट वजा केली जाईल.
दरम्यान, RailOne App च्या R Wallet द्वारे तिकिट बुक केल्यास आधीपासूनच 3 टक्के Cashback Bonus ची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना डिजिटल पेमेंटच्या वेगवेगळ्या पर्यायांमधून दुहेरी लाभ (Double Benefit) मिळत असल्याचे चित्र आहे.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांना Cashless Transactions कडे वळवणे आणि रोख व्यवहार कमी करणे. यामुळे केवळ तिकिट बुकिंग सुलभ होणार नाही, तर डिजिटल इंडिया योजेनेला देखील बळकटी मिळणार आहे.
RailOne Mobile App हे प्रवाशांसाठी एक All in One Platform ठरत आहे. या ॲपवर आरक्षित तिकीट, अनारक्षित तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग यांसह थेट रेल्वे स्थानकाची माहिती (लाईव्ह ट्रेन लोकेशन), पीएनआर स्थिती, डब्यांची स्थिती (कोच पोझिशन), प्रवासादरम्यान भोजन आरक्षण, तक्रारी व सूचना नोंदवणे तसेच पार्सल ट्रॅकिंग अशा अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे RailOne ॲप हे प्रवाशांसाठी एक स्मार्ट, सोयीस्कर आणि विश्वासार्ह डिजिटल साथीदार ठरत आहे.
हेही वाचा: Wireless Electricity: अद्भुत क्रांती! WiFi प्रमाणे आता मिळणार वीज, 'या' देशातील शास्त्रज्ञांचा मोठा शोध