Indian Seafarer Death: ओमानच्या किनाऱ्यावर भारतीय खलाशाचा ‘या’ कारणामुळे दुर्दैवी मृत्यू; पार्थिव भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू

मृत व्यक्तीची ओळख तामिळनाडूचे रहिवासी असलेले 35 वर्षीय निशांत उर्थानाथन अशी पटली असून, ते 'एमटी सेलेस्टियल' (MT Celestial) या व्यापारी जहाजावर 'सेकंड ऑफिसर' म्हणून कार्यरत होते.

Indian Seafarer Death: ओमानच्या किनाऱ्यावर भारतीय खलाशाचा ‘या’ कारणामुळे दुर्दैवी मृत्यू; पार्थिव भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू

Indian Seafarer Death: ओमानमधील डुक्म बंदरावर (Duqm Port) उभ्या असलेल्या एका मर्चंट नेव्हीच्या जहाजावर कार्यरत असलेल्या एका तरुण भारतीय खलाशाचा वैद्यकीय समस्येमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख तामिळनाडूचे रहिवासी असलेले 35 वर्षीय निशांत उर्थानाथन अशी पटली असून, ते ‘एमटी सेलेस्टियल’ (MT Celestial) या व्यापारी जहाजावर ‘सेकंड ऑफिसर’ म्हणून कार्यरत होते. ओमानमधील भारतीय दूतावास या घटनेची दखल घेत असून, त्यांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहे.

कायदेशीर सोपस्कार आणि समन्वयासाठी दूतावासाचे प्रयत्न
निशांत उर्थानाथन यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नेमक्या वैद्यकीय आजाराबाबत दूतावासाने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र, भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी ते मृताचे कुटुंबीय, जहाजावरील अन्य कर्मचारी आणि ओमानमधील स्थानिक प्राधिकरणाशी सतत संपर्कात आहेत. शनिवारी दूतावासाने या मृत्यूला दुजोरा दिला असून, मृतदेह जहाजावरून सुरक्षितपणे खाली उतरवून भारतात पाठवण्याची व्यवस्था केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे, तसेच शोकाकुल परिवाराप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

युनियनचे गंभीर आरोप आणि चौकशीची मागणी
दुसरीकडे, खलाशांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ (FSUI) ने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. युनियनच्या माहितीनुसार, उर्थानाथन हे 8 जून रोजी आजारी पडले होते आणि 11 जून रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता त्यांचे निधन झाले. निशांत यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना जहाजाबाहेर काढण्याचे (Emergency Evacuation) प्रयत्न अपयशी ठरल्याचा आरोप युनियनने केला आहे. मृत्यू झाल्यानंतरही सुमारे 2 दिवस त्यांचा मृतदेह जहाजावरच ठेवण्यात आला होता, कारण त्यादरम्यान डुक्म बंदरावरील दळणवळण यंत्रणा खंडित झाली होती.

दरम्यान, FSUI ने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “एका तरुण भारतीय खलाशाच्या प्राणांची किंमत फक्त 10 ओमानी रियाल (सुमारे 2473) ठरली, जी दुक्म बंदराजवळ एका तासाच्या वैद्यकीय व्हिसा किंवा स्थलांतर शुल्काएवढी आहे. जहाज मालकाच्या निष्काळजीपणामुळे निशांत यांचा मृत्यू झाला असून, मदतीसाठी झालेला विलंब आणि पार्थिव हाताळण्यात आलेले अपयश यावर ओमानच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले पाहिजे,” असे युनियनने म्हटले आहे.

हेही वाचा – Morena Railway Accident: रेल्वेला आग लागल्याच्या अफवेने घडला अनर्थ; घाबरून रुळावर उड्या मारणाऱ्या 4 प्रवाशांचा दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

‘एमटी सेलेस्टियल’ जहाजाची पार्श्वभूमी
यापूर्वी 20 मे रोजी यूएस सेंट्रल कमांडने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. त्यानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अमेरिकेच्या नाकेबंदीचे उल्लंघन करण्याच्या संशयावरून मरीन दलाने ‘एमटी सेलेस्टियल’ या शॅडो टँकरला रोखले होते. मात्र, जहाजाची पूर्ण झडती घेतल्यानंतर कोणताही संशयास्पद प्रकार न आढळल्याने त्याला सोडून देण्यात आले होते आणि कर्मचाऱ्यांना आपला सागरी मार्ग बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number