Wednesday, November 19, 2025 02:09:48 PM

Cyber Crime : तब्बल 50 लाखांना गंडा! पुण्यातून खंडणीसाठी फोन करत ‘Digital Arrest’; 57 लाख फॉलोअर्स असलेला इन्फ्लुएन्सर कसा ठरला बळी?

सॉफ्टवेअर अभियंता आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर असलेल्या पीडित अझीम अहमद याला खंडणीसाठी वर्षभरापासून धमकावले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

cyber crime  तब्बल 50 लाखांना गंडा पुण्यातून खंडणीसाठी फोन करत ‘digital arrest’ 57 लाख फॉलोअर्स असलेला इन्फ्लुएन्सर कसा ठरला बळी

Jabalpur Influencer Azim Ahmed Digital Arrest : मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका लोकप्रिय इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटरला सायबर गुन्हेगारांनी लाखोंचा गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. 96 इंस्टाग्राम पेजेसवर 57 लाख फॉलोअर्स असलेल्या 28 वर्षीय अझीम अहमद या तरुणाला 'बनावट कंटेंट स्ट्राइक' आणि पेज बॅन करण्याची धमकी देऊन अज्ञात आरोपींनी एक-दोन नाही, तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. या फसवणुकीचे कनेक्शन थेट पुण्याशी जोडले गेले असून, खंडणीसाठी आलेला एक कॉल पुण्यातील कॉलरचा होता, अशी माहिती पीडित तरुणाने दिली आहे.

पीडित अझीम अहमदने जबलपूर सायबर सेलकडे याबद्दल तक्रार दाखल केली आहे. सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या या तरुणाने 2017 मध्ये आपले पहिले इंस्टाग्राम पेज तयार केले आणि 2021 मध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यानंतर त्याने मित्रांसोबत ‘हूपी डिजिटल’ नावाचे डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप सुरू केले होते. मात्र, या यशानंतर त्याला जवळजवळ एक वर्षापासून सातत्याने खंडणीसाठी धमक्या येत आहेत.

हेही वाचा - OctaFX Ponzi Scam: धक्कादायक! स्पेनमध्ये बसून आरोपीने रचला मोठा सापळा; भारतीय गुंतवणूकदारांकडून लुटले 5,000 कोटी

सायबर गुन्हेगारांनी खंडणीसाठी धमकावल्यानंतर, आपली इंस्टाग्राम पेजेस आणि त्यातून होणारी कमाई गमावण्याच्या भीतीने  अहमदने त्यांना आतापर्यंत 50 लाख रुपये दिल्याचे सांगितले. अहमद म्हणाला की, त्याला फोन कॉल आणि ईमेल्सच्या माध्यमातून इंस्टाग्राम स्ट्राइकच्या धमक्या येत होत्या. “पुण्यातील एका कॉलरने बनावट स्ट्राइक काढून टाकण्यासाठी 25,000 ते 30,000 रुपयांची मागणी केली होती,” असेही त्याने सांगितले.

जबलपूर सायबर सेलचे प्रमुख नीरज नेगी यांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांनी "बनावट कंटेंट स्ट्राइक" ची धमकी देऊन जबलपूरमध्ये पैसे उकळल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. नेगी म्हणाले, “हा सायबर गुन्हेगारीचा एक नवीन ट्रेंड आहे. फसवणूक करणारे इंस्टाग्रामच्या ऑटोमेटेड कंटेंट सिस्टीमचा गैरफायदा घेत आहेत.” 'हूपी डिजिटल'चा संस्थापक असूनही, एका वर्षाहून अधिक काळ चाललेल्या या डिजिटल ब्लॅकमेलिंगचा अझीम अहमद हा बळी ठरला आहे, तर अज्ञात आरोपी अजूनही फरार आहेत.

हेही वाचा - Digital Arrest Case : अभिनेत्री ठरली डिजिटल अरेस्टची बळी; पोलीस अधिकारी असल्याचं सांगत 6.5 लाखांना लुटलं


सम्बन्धित सामग्री