मुंबई: लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, आजकाल अनेकजण इंस्टाग्राम वापरतात. मात्र, इंस्टाग्राम वापरताना आपल्यासमोर बरेच 18+ कंटेंट रील्स येतात. त्यामुळे, कळत नकळत किशोरवयीन मुलांवर, विशेषत: 18 वयापेक्षा कमी वयाच्या मुलांवर चुकीचा परिणाम होतो. 18 वर्षांखालील मुले अनेक गोष्टींमध्ये गुंतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, जसे की गुन्हेगारीचे प्रमाण वाढणे, ड्रग्जचा वापर, इत्यादी.
या घटना टाळण्यासाठी, इंस्टाग्रामने 18 वर्षांखालील मुलांसाठी नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये तयार केली आहेत. मेटाने जाहीर केले की आता किशोरवयीन मुलांना केवळ पीजी-13 दर्जाचीच सामग्री दाखवली जाईल. याचा अर्थ असा होतो की, किशोरवयीन मुलांना प्रौढ (18+), ड्रग्ज किंवा धोकादायक स्टंट यासारख्या संवेदनशील विषयांवरील पोस्ट दिसणार नाहीत.
गेल्या वर्षी आलेल्या 'टीन अकाउंट्स' नंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असल्याचे मेटाचे म्हणणे आहे. यात किशोरवयीन वापरकर्ते आता स्वत:हून त्यांच्या सामग्रीच्या सेटिंग्ज बदलू शकणार नाहीत. जर त्यांना अधिक स्पष्ट सामग्री पाहायची असेल, तर पालकांची परवानगी आवश्यक असेल. मेटाने पालकांसाठी खास 'मर्यादित सामग्री मोड' जोडला आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलांना कोणती सामग्री पाहता येईल किंवा कोणत्या पोस्टवर टिप्पणी करता येईल हे त्यांचे पालक नियंत्रित करू शकतील.
हेही वाचा: Supreme Court : मृत्युदंडासाठी पर्यायी पद्धतींचा विचार करा; सुनावनीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला सूचना
नवीन नियमांनुसार, कठोर भाषा, ड्रग्ज, धोकादायक स्टंट, तसेच गांजा, मद्यपान किंवा आक्षेपार्ह शब्द असलेली पोस्ट आता ब्लॉक केली जाईल. असे खाते जे सतत चुकीच्या प्रकारचे कंटेंट पोस्ट करतात किंवा OnlyFans सारख्या साइट्सचा उल्लेख केला जातो, अशा पोस्टना किंवा साइट्सना 18 वयापेक्षा कमी वयाची मुले फॉलो करू शकणार नाहीत. यासोबतच, पीजी-13 नियंत्रण आता एआय चॅट्सवरही लागू होणार आहे. मेटाचे म्हणणे आहे की, हे नवीन बदल डिजिटल युगात अल्पवयीन मुलांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत करतील.