International Yoga Day 2025: आज, 21 जून 2025, संपूर्ण जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपल्या भारताने जगाला दिलेली ही योगसंपदा आता केवळ शरीर सौष्ठवासाठी नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाची मानली जाते. यंदाची थीम आहे 'Yoga for Wellness' म्हणजेच सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योग.
सध्याच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात योगासने म्हणजे एक शांतीचा मार्ग. योग केवळ व्यायाम नसून ती जीवन जगण्याची कला आहे. या योग दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी 10 सोपी आणि घरच्या घरी करता येतील अशी योगासने, त्यांची योग पद्धत (प्रक्रिया) आणि फायदे सविस्तरपणे घेऊन आलो आहोत.
1. ताडासन (Tadasana)
प्रक्रिया: सरळ उभे राहून हात वर उंच करा. पंजांवर उभे राहा आणि शरीर ताणा.
फायदे: उंची वाढते, शरीराची लवचिकता वाढते, स्नायूंना ताकद मिळते.
2. वज्रासन (Vajrasana)
प्रक्रिया: गुडघ्यावर बसून पाय मागे वाकवा. हात मांडीवर ठेवा आणि पाठ ताठ ठेवा.
फायदे: पचन सुधारते, ध्यानासाठी उपयुक्त, पाठदुखी कमी होते.
3. भुजंगासन (Bhujangasana)
प्रक्रिया: पोटावर झोपा. हात खांद्याखाली ठेवून वर उचला, डोकं मागे झुकवा.
फायदे: पाठीचा कणा लवचिक होतो, फुफ्फुसं बळकट होतात.
4. बालासन (Balasana)
प्रक्रिया: गुडघ्यावर बसून शरीर पुढे झुकवा, कपाळ जमिनीला टेकवा, हात समोर न्या.
फायदे: तणाव कमी होतो, पाठीचा ताठेपणा कमी होतो.
हेही वाचा: Today's Horoscope: आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
5. पश्चिमोत्तानासन (Paschimottanasana)
प्रक्रिया: पाय सरळ करून बसून वरून पुढे झुकून पायांचे अंगठे धरावेत.
फायदे: पोटावरची चरबी कमी होते, पचन सुधारते.
6. भ्रामरी प्राणायाम (Bhramari)
प्रक्रिया: डोळे बंद करून, नाकाने श्वास घ्या व मधमाशीसारखा आवाज करत श्वास सोडा.
फायदे: तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते, मेंदू शांत राहतो.
7. अनुलोम-विलोम प्राणायाम
प्रक्रिया: उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, डाव्या नाकपुडीने सोडा, नंतर उलट.
फायदे: रक्तदाब नियंत्रित होतो, श्वसन सुधारते.
8. मकरासन (Makarasana)
प्रक्रिया: पोटावर झोपा, हात कपाळाखाली ठेवून शरीर पूर्ण शिथील करा.
फायदे: पाठदुखी कमी होते, विश्रांती मिळते.
9. त्रिकोणासन (Trikonasana)
प्रक्रिया: पाय फाकवा, एका बाजूला वाका, एक हात पायाजवळ व दुसरा वर.
फायदे: पोटाची चरबी कमी होते, पाठीला लवचिकता येते.
10. शवासन (Shavasana)
प्रक्रिया: पाठ टेकवून झोपा, हात-पाय बाजूला, डोळे मिटा, संपूर्ण शरीर शिथील करा.
फायदे: तणाव कमी होतो, झोप सुधारते, मानसिक शांती मिळते.
नियमित योग केल्यास फक्त आजारांपासून बचाव होत नाही तर जीवनात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या आंतरराष्ट्रीय योग दिनी, तुमच्या आरोग्याचा संकल्प घ्या 'दररोज थोडा वेळ स्वतःसाठी, योगासाठी'
सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा