IPL 2026: ‘सिक्सर किंग’ अभिषेक शर्माचा KKR विरुद्ध झंझावात! रोहित शर्माच्या विक्रमाशी साधली बरोबरी, रचला षटकारांचा ‘त्रिशतकी’ इतिहास

या खेळीसह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 300 षटकारांचा टप्पा ओलांडला असून, रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.

IPL 2026: ‘सिक्सर किंग’ अभिषेक शर्माचा KKR विरुद्ध झंझावात! रोहित शर्माच्या विक्रमाशी साधली बरोबरी, रचला षटकारांचा ‘त्रिशतकी’ इतिहास

कोलकाता: क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा असतो, कधी शिखरावर तर कधी पायथ्याशी. आयपीएल 2026 च्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादची अवस्था अशीच काहीशी झाली. पहिल्याच सामन्यात पत्करावा लागलेला अनपेक्षित पराभव आणि सलामीवीर अभिषेक शर्माची शांत राहिलेली बॅट… यामुळे चाहते थोडे निराश होते. पण, अभिषेकने फार काळ निराशा टिकू दिली नाही. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने त्याच्या फलंदाजीतील ‘पॉवर’ आणि ‘क्लास’ दोन्ही दाखवून दिले. त्याची ही खेळी केवळ आक्रमक नव्हती, तर एकापाठोपाठ एक विक्रमांना गवसणी घालणारी ठरली.

केकेआर विरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात अभिषेक शर्माच्या डोळ्यांत पहिल्या पराभवाची सल स्पष्ट दिसत होती. मैदानात उतरताच त्याने गोलंदाजांवर निर्दयी प्रहार करण्यास सुरुवात केली. अवघ्या 21 चेंडूंमध्ये त्याने 48 धावांची वादळी खेळी साकारली. या झंझावाती खेळीत त्याने चार उत्तुंग षटकार आणि चार खणखणीत चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या या स्फोटक फलंदाजीमुळे हैदराबादच्या धावगतीला अशी काही गती मिळाली, की विरोधी संघाच्या गोलंदाजांचे मनोधैर्य खचताना दिसले.

या सामन्यातील सर्वात थरारक क्षण आला तो फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या षटकात. अभिषेकने या एकाच षटकात अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. वरुणच्या गोलंदाजीवर त्याने दोन उत्तुंग षटकार आणि तीन खणखणीत चौकार वसूल करत 24 धावा चोपल्या. त्यात एका वाईड चेंडूची भर पडल्याने या षटकातून हैदराबादला तब्बल 25 धावा मिळाल्या. अभिषेकचा हा आक्रमक अवतार पाहून केकेआरचे गोलंदाज आणि कर्णधार पूर्णपणे हतबल झालेले पाहायला मिळाले.

हेही वाचा: Drunk ST Conducter : उभं राहाणं सोडाच पण तिकिटही देता येईना! मद्यधुंद वाहकाचा प्रवासी आणि चालकांना मनस्ताप, व्हिडीओ व्हायरल

त्याच्या या तडाखेबंद खेळीदरम्यान अभिषेक शर्माने एका अनोख्या ‘त्रिशतका’ला गवसणी घातली आहे. त्याने टी-20 क्रिकेटमधील आपले 300 षटकार पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, टी-20 फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजीला येत 300 किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणारा तो केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या विलक्षण विक्रमासह त्याने जागतिक आणि भारतीय क्रिकेटमधील त्याची वेगळी ओळख अधिकच गडद केली आहे.

या अभिमानास्पद यादीत भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ म्हणजेच रोहित शर्मा अव्वल स्थानावर विराजमान आहे. रोहितने सलामीवीर म्हणून आतापर्यंत 330 षटकार मारले आहेत. तर, अभिषेक शर्मा आता एकूण 301 षटकारांसह या यादीत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

याशिवाय, तो सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचायझीसाठी 100 पेक्षा अधिक षटकार ठोकणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. वयाच्या आणि अनुभवाच्या तुलनेत अभिषेकने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद असून, यंदाच्या हंगामात तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार हे मात्र निश्चित! 

हेही वाचा: Sunetra Pawar Meet Praful Patel-Sunil Tatkare: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांनी घेतली पटेल-तटकरेंची नवी दिल्लीत भेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number