अहमदाबाद: गुजरात टायटन्सने दमदार खेळ करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरवर 4 विकेट्सनी विजय मिळवला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात उत्कंठावर्धक चुरस पाहायला मिळाली. विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमार याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतरही बंगळुरला पराभवाचा सामना करावा लागला.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरची सुरुवात काहीशी सावध झाली. विराट कोहली याने 28 धावा तर देवदत्त पडिक्कल याने 40 धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. परिणामी, संघाला 155 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी संघर्ष करावा लागला.
या सामन्यात भुवनेश्वर कुमारने त्याच्या टी20 कारकिर्दीत 350 विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला. साई सुदर्शन याचा बळी घेत त्याने ही कामगिरी पूर्ण केली. तो युजवेंद्र चहल याच्यानंतर हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर या महत्त्वाच्या विकेट्स घेत एकूण 352 विकेट्सचा टप्पा पार केला.
Revenge completed in their own backyard! ?️ Celebrations in the #GT camp as they seal a much-needed 4️⃣-wicket win over #RCB in Ahmedabad ? Scorecard ▶️ https://t.co/I5Hg8ybefh#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRCB | @gujarat_titans pic.twitter.com/qWfAmFUhRP — IndianPremierLeague (@IPL) April 30, 2026
156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात मात्र डळमळीत झाली. साई सुदर्शन लवकर बाद झाला. पण कर्णधार शुभमन गिल याने आक्रमक फलंदाजी करत 18 चेंडूत 43 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीमुळे सामन्याचा रंग बदलला. दरम्यान, विराट कोहलीने घेतलेला झेल हा देखील सामन्यातील खास क्षण ठरला.
यानंतर जोस बटलर याने 19 चेंडूत 39 धावा करत संघाला मजबुती दिली. शेवटी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या राहुल तेवतियाने नाबाद 27 धावांची निर्णायक खेळी करत गुजरातला सहज विजय मिळवून दिला. गुजरातने हा सामना 25 चेंडू राखून जिंकत नेट रनरेटमध्येही महत्त्वाची भर घातली.
He can’t stop taking wickets ?? Bhuvneshwar Kumar with a breathtaking spell of 3/28 ? Updates ▶️ https://t.co/I5Hg8ybefh#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRCB pic.twitter.com/GjaTWAF0ZK — IndianPremierLeague (@IPL) April 30, 2026
या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 हंगामातील त्यांचा पाचवा विजय नोंदवला आणि 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. तर बंगळूर संघाने पराभवानंतरही दुसरे स्थान कायम राखले आहे. हा सामना गुजरातच्या आत्मविश्वासासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.