Tuesday, February 17, 2026 05:06:32 PM

Railway Travel Insurance: रेल्वेच्या जनरल तिकिटावर विमा मिळतो? काय आहे नियम ?

प्रवासादरम्यान मिळणाऱ्या विम्याबाबत अद्यापही अनेक प्रवाशांच्या मनात संभ्रम आहे. विशेषतः जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे विमा देते की नाही, याबद्दलची वस्तुस्थिती समोर आली आहे.

railway travel insurance रेल्वेच्या जनरल तिकिटावर विमा मिळतो काय आहे नियम

Railway Travel Insurance : भारतात दररोज लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. ऑनलाइन तिकीट बुक करणे किंवा जेवण ऑर्डर करणे या गोष्टी आता सर्वांच्या अंगवळणी पडल्या आहेत. मात्र, प्रवासादरम्यान मिळणाऱ्या विम्याबाबत (Insurance) अद्यापही अनेक प्रवाशांच्या मनात संभ्रम आहे. विशेषतः जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे विमा देते की नाही, याबद्दलची वस्तुस्थिती समोर आली आहे.

जनरल तिकिटावर विमा मिळतो का?
अनेकदा प्रवाशांना असे वाटते की रेल्वेचे तिकीट काढले म्हणजे विमा मिळालाच. परंतु, वास्तव तसे नाही. जनरल तिकिटावर (Unreserved Ticket) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून कोणताही 'विमा' (Insurance) दिला जात नाही. विम्याचे संरक्षण केवळ विशिष्ट वर्गातील प्रवाशांनाच मिळते. मात्र, दुर्दैवाने रेल्वे अपघात झाल्यास, रेल्वे कायदा 1989 नुसार सर्व प्रवाशांना (जनरल प्रवाशांसह) रेल्वेकडून भरपाई (Compensation) मिळण्याचा अधिकार असतो.

विमा कोणाला आणि कधी मिळतो?
रेल्वेची विमा योजना ही केवळ आरक्षित वर्गांमध्ये (SL, 1AC, 2AC आणि 3AC) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. मात्र, यामध्येही एक महत्त्वाची अट आहे. हा विमा केवळ IRCTC च्या वेबसाइट किंवा ॲपवरून ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनाच मिळतो. तिकीट बुक करताना प्रवाशांना विम्याचा पर्याय निवडावा लागतो.

हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! तीन महिन्यांचा हप्ता एकत्र; खात्यात थेट 4500 रुपये?

या प्रवाशांना मिळत नाही लाभ
ऑनलाइन तिकिटांव्यतिरिक्त इतर मार्गांनी प्रवास करणाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे:

- रेल्वेच्या मॅन्युअल आरक्षण काउंटरवरून (विंडो तिकीट) आरक्षित तिकीट काढणारे प्रवासी.
- पॅसेंजर गाड्या आणि उपनगरीय (Local Trains) गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी.
- कोणत्याही प्रकारचे जनरल (विनाआरक्षित) तिकीट घेऊन प्रवास करणारे प्रवासी.

रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षा महत्त्वाची असल्याने, ऑनलाइन तिकीट बुक करताना मिळणाऱ्या अल्प दरातील विम्याचा पर्याय निवडणे प्रवाशांच्या फायद्याचे ठरते. 
 


सम्बन्धित सामग्री