Couple Accident Incident: तेलंगणाहून जळगावला निघालेले दांपत्य रहस्यमयरित्या गायब, पण समोर आलं वेगळचं सत्य

पोलिसांच्या शोधात त्यांची कार बुलढाणा जिल्ह्यातील विहिरीत आढळली आणि दोघांचे मृतदेह सापडले. अपघात की घातपात, याबाबत तपास सुरू असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.

Couple Accident Incident: तेलंगणाहून जळगावला निघालेले दांपत्य रहस्यमयरित्या गायब, पण समोर आलं वेगळचं सत्य

तेलंगणाहून जळगावकडे लग्नकार्याकरिता निघालेल्या पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील या दांपत्याच्या रहस्यमयरित्या बेपत्ता होण्यामुळे तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा संपर्क होत नसल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. सततच्या शोधाशोधीनंतर आता या प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महामार्गालगतच्या एका विहिरीत त्यांच्या कारसह दोघांचेही मृतदेह सापडले असून परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे.

पद्मसिंह पाटील हे सीतापुरम, तेलंगणा येथील रहिवासी असून ते पत्नी नम्रता पाटील यांच्यासह 27 नोव्हेंबरच्या पहाटे जळगावकडे निघाले होते. संध्याकाळपर्यंत ते पोहोचतील अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र दिवसभर त्यांच्याशी संपर्क न झाल्याने सर्वांनी घाईघाईने शोधकार्य सुरू केले. त्यांची बेपत्ता होण्याची तक्रार तत्काळ स्थानिक पोलिसांकडे दाखल करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांनी मिळून मोबाईल लोकेशन तपासले असता, दांपत्याचे शेवटचे लोकेशन खामगाव मलकापूर दरम्यानच्या वडनेर परिसरात मिळाले. त्यानंतर परिसरात तपास वाढवण्यात आला.

हेही वाचा: Drone Attack on Russian Tankers : ब्लॅक सीमधील ड्रोन हल्ल्यात रशियाच्या 'शॅडो फ्लीट' जळून खाक! युक्रेनने स्वीकारली जबाबदारी

याच वेळी महामार्गालगतच्या एका विहिरीत कारचा मागोवा लागला. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढल्यावर आत दोघांचेही मृतदेह आढळून आले. या दृश्याने स्थानिक लोक घाबरून गेले. या मृत्यूमागील कारणाबाबत अद्याप स्पष्टता नसून ‘अपघात की घातपात?’ हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. कार थेट विहिरीत कशी गेली? महामार्गावर अशी दुर्घटना कशी घडली? या सर्व मुद्द्यांवर नातेवाईक आणि गावकरी संशय व्यक्त करत आहेत. विशेषत: हा संपूर्ण परिसर अंधारमय आणि ओसाड असल्याने कोणीतरी जाणूनबुजून कार खाली ढकलल्याचा संशय अधिक गडद होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, महामार्गालगत असलेली खुली विहीर न बुजविल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, अशीही शक्यता पुढे येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची भूमिकाही तपासाच्या कक्षेत आली आहे. अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या मृत्यूला संशयास्पद मानत विविध शक्यता पाहून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेज, लोकेशन डेटा आणि वाहनाच्या हालचालींचा तपशील गोळा केला जात आहे. या दोघांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेलं गूढ उलगडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असून या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather: दितवाह वादळामुळे हवामानात उलथापालथ! महाराष्ट्रात पुन्हा कडाक्याच्या थंडीचे आगमन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number