Wednesday, June 18, 2025 02:09:25 PM

गद्दार ज्योती मल्होत्राची फॉरेन्सिक तपासणीत पोलखोल; दानिशसह अनेक पाक अधिकाऱ्याशी कोडवर्डमध्ये चॅटिंग

व्हाट्सअँपच्या माध्यमातून ज्योती मल्होत्रा पाक एजंट अली हसनसोबत कोडवर्डमध्ये बोलायची. सोबतच, पाकिस्तानी अधिकारी हा ज्योतीकडून अटारी बॉर्डरबद्दलची गुप्त माहिती घेत असल्याची बाब समोर आली आहे.

गद्दार ज्योती मल्होत्राची फॉरेन्सिक तपासणीत पोलखोल दानिशसह अनेक पाक अधिकाऱ्याशी कोडवर्डमध्ये चॅटिंग

नवी दिल्ली: 17 मे रोजी गद्दार ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर नुकताच तिचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतचे असणारे कनेक्शन समोर आले आहे. माहितीनुसार, व्हाट्सअँपच्या माध्यमातून ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी एजंट अली हसनसोबत बोलायची, ज्यामध्ये ती कोडवर्डचा वापर करत होती. त्यासोबतच, पाकिस्तानी अधिकारी हा ज्योतीकडून अटारी बॉर्डरबद्दलची गुप्त माहिती घेत असल्याची बाब समोर आली आहे. नुकताच, ज्योती आणि पाकिस्तानी अधिकाऱ्याचे व्हाट्सअँप चॅटिंग समोर आली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 


पाक अधिकाऱ्यासोबत कोडवर्डमध्ये चॅटिंग:

पाक अधिकारी अली हसन: जब आप गए थे अटारी,वहां प्रोटोकॉल किस-किस को मिला था?

ज्योती: किसको मिला? मुझे तो मिला नहीं.

अली हसन: इट मीन, कोई अंडर कवर पर्सन हो जैसे, यार पता चल जाता है देखकर. 

अली हसन: आप को कैसे निकालना था या उसको अंदर ले कर आना था, इट्स माय मॅटर. 

अली हसन: उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था आपने, रुम में दोने को बैठा देना था,अभी लगे रहो.

ज्योती: नहीं, इतने पागल थोडी ना थे वो. 


ज्योती मल्होत्रा युट्यूबर असून तिच्या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून ती आस्तिक असल्याचा दावा करताना पाहायला मिळते. तसेच, तिच्या युट्यूब व्हिडिओमध्ये धार्मिक स्थळांची माहिती कमी आणि देशांच्या सीमेबाबत माहिती सर्वाधिक देताना पाहायला मिळते. त्यासोबतच, सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांबद्दल अधिक माहिती देतानाचे पाहायला मिळते. अफगाणिस्तान सीमेवरीवरील व्हिडिओमधून हा पॅटर्न उघडकीस झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री