Kashmiri Muslims Support Iran : यांना काय म्हणावं? इराणच्या मदतीसाठी काश्मिरी मुस्लीम सरसावले! महिलांनी दान केले सोन्याचे दागिने

या दानशूर व्यक्तींना त्यांनी केलेल्या दानाविषयी चौकशी करण्यासाठी भारतीय प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. मात्र, यावर याच लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Kashmiri Muslims Support Iran : यांना काय म्हणावं? इराणच्या मदतीसाठी काश्मिरी मुस्लीम सरसावले! महिलांनी दान केले सोन्याचे दागिने

Kashmiri Muslims Support Iran : युद्ध आणि निर्बंधांच्या झळा सोसणाऱ्या इराणला आधार देण्यासाठी काश्मीरमधील मुस्लीम लोकांनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या 24 व्या दिवशी काश्मीरमधील हजारो नागरिकांनी सांप्रदायिक भावनेचे दर्शन घडवत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि तांब्याची भांडी दान केली आहेत. सोमवारी (23 मार्च 2026) सलग दुसऱ्या दिवशीही हा मदत उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान, काश्मिरी मुस्लिमांच्या या कृतीसाठी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकाराचा जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे.

मदतीसाठी काश्मीरमध्ये ठिकठिकाणी शिबिरे
अधिकारी आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील जदीबल, हसनाबाद, शालीमार, कमरवारी, लावेपोरा आणि बेमिना यांसारख्या भागांत विशेष दान शिबिरे लावण्यात आली होती. या मोहिमेत केवळ शिया मुस्लीम समुदायच नव्हे, तर बहुसंख्य सुन्नी समुदायानेही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. बडगाम, बांदीपोरा आणि बारामुल्ला या जिल्ह्यांतही अशाच प्रकारच्या मोहिमा राबवून इराणमधील युद्धग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात आली.
दरम्यान, भारतात राहूनही भारताच्या बाजूने उभे राहण्यासाठी किंवा मदतीसाठी हे लोक पुढे येत नाहीत. तसेच, भारतीय प्रशासन आणि त्यांच्या योजनांचा वापर करून घेत राहतात. मात्र, देशाबाबत कोणतीही आपुलकीची भावना त्यांच्या मनात नाही. यामुळे भारतीयांच्या मनात या सर्व प्रकाराबद्दल खदखद आहे. हे लोक भारतीय सैन्याला कधीही पाठिंबा देणार नाहीत.. हे गद्दार आहेत, अशा शब्दांत या प्रकाराचा सोशल मीडियावर समाचार घेतला जात आहे.

महिलांनी केले सढळपणे दान
या मदत मोहिमेत महिलांनी केलेले दान विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक महिलांनी आपले सोन्याचे दागिने, चांदीची आणि तांब्याची घरगुती भांडी दान केली. इराण आणि तेथील मुस्लिमांसाठी काश्मीरी मुस्लिमांच्या हृदयांमध्ये विशेष भावना असल्याचे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. कधी इराणला मदत करण्यासाठी तर कधी इराणसाठी आंदोलने करण्यासाठी काश्मीरी मुस्लीम नेहमीच सरसावले असल्याचे समोर आले आहे. या भावूक कृतीची दखल घेत नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने ‘X’ वर पोस्ट करत काश्मिरी बहिणीचे आणि भारताचे आभार मानले आहेत. “तुमचे अश्रू आणि निर्मळ भावना इराणसाठी सर्वात मोठा आधार आहेत,” असे दूतावासाने म्हटले आहे.

हेही वाचा – Nora Fatehi Song Controvercy: नोरा फतेहीवर ‘वर्क परमिट’चा गैरफायदा घेतल्याचा आरोप; 10 वकिलांची टीम सरसावली, अभिनेत्रीची भारतातून होणार हकालपट्टी?

भारतीय प्रशासनाला हस्तक्षेप किंवा चौकशी न करण्याचे आवाहन
ऑल जम्मू-काश्मीर शिया असोसिएशनचे अध्यक्ष इम्रान अन्सारी यांनी सांगितले की, काश्मिरी मुस्लीम इराणच्या पाठीशी उभे राहणे आपले नैतिक आणि सांप्रदायिक कर्तव्य मानतात. अनेक मुलांनी आपल्या पिगी बँकमधील साठवलेले पैसे दिले, तर काही शेतकरी कुटुंबांनी पशुधनही दान केले आहे. ही सर्व मदत इराणी दूतावास आणि अधिकृत मदत संस्थांमार्फत इराणला पाठवली जाणार आहे. दरम्यान, दानशूर व्यक्तींना त्यांनी केलेल्या दानाविषयी आणि त्यांच्याकडे येत असलेल्या तसेच, आधीपासून असलेल्या संपत्तीविषयी चौकशी करण्यासाठी भारतीय प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. मात्र, यावर इम्रान अन्सारी यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. उलट, भारतीय प्रशासनाने या प्रक्रियेत मुळीच हस्तक्षेप न करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रकारावरून या सर्वांनाच इराणला का पाठवून देऊ नये, असाही सवाल लोक सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत.

इराण युद्धाची सद्यस्थिती
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धाचा आज 24 वा दिवस आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू असून मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी इराणला दिलेली मुदत वाढवली आहे. अमेरिका पुढील 5 दिवस इराणच्या पॉवर प्लांटवर कोणतेही हल्ले करणार नाही, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. जगभरातील अनेक देशांनी या युद्धाचा निषेध केला आहे. पश्चिम आशिया क्षेत्रातील देशांवर हल्ले केल्याबद्दल अनेक देशांनी इराणवर टीका केली आहे.

हेही वाचा – Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प कधी काय बरळतील याचा नेम नाही; आता म्हणे ‘होर्मुजचे नियंत्रण मी आणि अयातुल्लाह मिळून सांभाळू’, इराणकडून मात्र…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number