6 जणांवर जीवघेणा हल्ला! 23 वर्षांचा तरुण स्वतःच्याच घरच्यांच्या जीवावर का उठला? विष प्यायल्याचं सांगत पोलिसांसमोर हजर

वय 23 वर्ष! तीन तासांत, तीन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाने स्वतःच्याच कुटुंबातील 6 जणांवर जीवघेणा हल्ला केला. नंतर पोलीस ठाण्यात हजर होत विष प्यायल्याचं सांगितलं. हल्ला झालेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला.

6 जणांवर जीवघेणा हल्ला! 23 वर्षांचा तरुण स्वतःच्याच घरच्यांच्या जीवावर का उठला? विष प्यायल्याचं सांगत पोलिसांसमोर हजर

Crime News : सोमवारी सायंकाळी काही तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी या हत्याकांडाच्या घटना घडल्या. एका 23 वर्षीय तरुणाने त्याच्याच आईसह घरातील सहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. यानंतर तरुणाने विष प्यायल्याचं सांगत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्याने हल्ला केलेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, त्याची आई अत्यवस्थ असून रुग्णालयात आहे.

आफन असे या तरुणाचे नाव आहे. त्याने त्याच्या आजी, भाऊ आणि प्रेयसीसह सहा जणांची हत्या केल्याचा पोलिसांसमोर दावा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांच्या मृत्यूची नोंद केली असून आईची स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

हेही वाचा – हनीमूनला गेलेल्या नवविवाहितेला पतीकडून मारहाण; जीव वाचवून गोव्याहून एकटीच परतली, गुन्हा दाखल

हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्या कुटुंबियांवर मोठं कर्ज होतं. त्यामुळे त्याने त्याच्या कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. आखाती देशांमध्ये त्यांचा व्यवसाय होता. हा व्यवसाय डबघाईला आल्याने त्यांच्यावर कर्ज वाढले होते. केरळच्या तिरुअनंतपुरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आफन आणि अफझान हे दोघे भाऊ आखाती देशांमध्ये त्यांच्या वडिलांबरोबर एक व्यवसाय करत होते. मात्र, व्यवसायात नुकसान झाल्याने ते केरळला परतले होते.

पाच जणांचा मृत्यू, आईची स्थिती नाजूक
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने आधी त्याची आजी सलमा बीबी (88) यांची पंगोडा येथील राहत्या घरात हत्या केली. त्यानंतर तो त्याचे काका अब्दुल लतिफ (58) यांच्या घरी एस. एन पुरम येथे गेला. तिथे त्याने काका आणि काकू यांची हत्या केली. तेथून तो पिरुमाला येथील त्याच्या घरी आला. तिथे त्याने त्याच्या आईवर हल्ला केला आणि भाऊ अफझान (14) आणि प्रेयसी फरशाना (19) यांची हत्या केली. या हत्या केल्यानंतर तो थेट वंजारामूडू पोलीस ठाण्यात रिक्षाने गेला आणि तिथे त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. तसेच, त्यानेही विष प्यायलं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांच्या मृत्यूंची नोंद केली असून त्याच्या आईला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या आईला आधीच कर्करोग झाल्याचेही निदान झाले आहे.

हेही वाचा – हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी सुनेला दिले एचआयव्हीबाधित इंजेक्शन, एफआयआर दाखल

दरम्यान, त्याने दिलेल्या माहितीवर संपूर्णपणे अवलंबून न राहता पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे. त्यांचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याचे कॉल डिटेल्स चेक केले जात आहेत. तसंच, त्याला अंमली पदार्थांचं व्यसन आहे का, हेही तपासलं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number