Kunal Kamra Serious Allegations on Modi Government : प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) स्थितीबद्दल एक व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकारवर (Modi Government) गंभीर स्वरूपाचे आरोप करत तीव्र टीका केली आहे. सामान्य माणसांसाठी आजही सर्वात स्वस्त आणि महत्त्वाचे दळणवळणाचे साधन रेल्वे असताना, केंद्र सरकार रेल्वेच्या खासगीकरणाचा (Privatization of Indian Railway) डाव साधत असल्याचा आरोप त्याने केला आहे. ‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari) या व्हिडिओमधून कुणाल कामराने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
विकासाच्या रुळावर रेल्वे धावते आहे का?
कुणाल कामराने व्हिडिओच्या सुरुवातीलाच नॉस्टेल्जिया (Nostalgia) चा उल्लेख करत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे: “रेल्वेचं आपलं सगळ्यांचं जुनं नातं आहे. पण प्रश्न असा आहे की विकासाच्या रुळावर रेल्वे धावते आहे का? की नॉस्टेल्जियाच्या डॉकयार्डला दीर्घकाळ उभी आहे?” 2014 च्या आधी रेल्वेची काय अवस्था होती, हे मोदींनी भाषणात सांगितले होते. पण त्यानंतर काय घडले, याचे मुद्दे मांडत कामराने सरकारला धारेवर धरले आहे. त्याचा आरोप आहे की, 2014 नंतर रेल्वेचा कायापालट करण्याचे काम सुरू झाले असलेले दिसत असले तरी, वस्तुस्थिती वेगळी आहे. 2023 मध्ये रेल्वेचे 25 हजार अपघात झाले, ज्यात 22 हजार लोकांचा मृत्यू झाला, तर ट्रेन घसरणे अगदीच सामान्य झाले आहे. रेल्वे बोर्डाच्या 2021 च्या अहवालानुसार, 2014 मध्ये रेल्वेची सुरक्षा व्यवस्था योग्य नव्हती, असेही त्याने नमूद केले.
रिक्त पदे आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
कुणाल कामराने नोकरीच्या संधींबाबत (Job Opportunities) गंभीर आरोप केले आहेत. देशातील युवक बेरोजगार असताना रेल्वेतील महत्त्वाची पदे अद्यापही रिक्त (Vacant Posts in Railway) आहेत. बालासोर अपघाताच्या वेळी रेल्वेच्या 3 लाख 12 हजार जागा भरणे बाकी होते. मार्च 2024 पर्यंत रेल्वेच्या सुरक्षा विभागात 1 लाख 5 हजार रिक्त जागा आहेत. यामध्ये ट्रेन ड्रायव्हर्स (Train Drivers), ट्रेन कंट्रोलर्स (Train Controllers), क्रू कंट्रोर्लस, पॉईंट्स मेन (Points Men) अशा महत्त्वाच्या जागा रिक्त असणे हा एक प्रकारे धोकाच आहे. 2024 मध्ये रेल्वेमंत्र्यांनी दीड लाख कर्मचाऱ्यांची नोकरीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे सांगितले असले तरी, प्रत्यक्षात लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, असा दावा कामराने केला आहे.
हेही वाचा – SC On Bill Assent : राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत ठरवू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय
लोक पायलटस आणि इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण
कामरा पुढे म्हणतो की, रिक्त पदांमुळे लोको पायलट्सवर (Loco Pilots) कामाचा प्रचंड ताण आहे. एका घटनेचा दाखला देत तो म्हणाला, 3 जून 2024 ला लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट दोघांनाही झोप लागून ते खाली पडले. कारण, त्यांची ती सलग चौथी नाईट ड्युटी होती. 12 नाईट ड्युटी सलग करणारेही लोको पायलट आहेत. अतिरिक्त स्टाफ नसल्यामुळे त्यांना सुट्ट्या मिळत नाहीत आणि अपघातांची शक्यता वाढते.
ट्रॅक मेंटेनर्सची भयावह अवस्था
ट्रॅक मेंटेनर्स (Track Maintainers) हे खूप महत्त्वाचे काम करतात, पण दरवर्षी किमान 400 ट्रॅक मेंटेनर्सचा मृत्यू होतो. ट्रॅक देखभाल करणारे लोक रोज 15 किलो तरी वजन उचलून चालत असतात. त्यांची मॉर्निंग शिफ्ट संध्याकाळी 4 किंवा 5 वाजता संपते आणि 10 वाजता त्यांना परत नाईट शिफ्टसाठी बोलावले जाते. यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि अपघात होतात.
पाहा व्हिडिओ
All steps are being taken to make Indian Railways Private – https://t.co/dMNc5whvUQ pic.twitter.com/HYLcBhtMMk — Kunal Kamra (@kunalkamra88) November 19, 2025
कुणाल कामराचे प्रमुख आरोप
कुणाल कामराचा थेट आरोप आहे की, ‘रेल्वे हा भारतीय व्यवस्थेचा कणा (Backbone) आहे, मोदी सरकारने त्याचं कंबरडं मोडलं आहे.’ आणि हे सर्व जाणीवपूर्वक केलं जात असून ते केवळ रेल्वेचं नजिकच्या भविष्यात खासगीकरण करता यावं, या हेतूसाठी होत आहे. त्याच्या प्रमुख आरोपांचा सारांश खालीलप्रमाणे आहे:
1. भारतात रेल्वेचा दर 10 दिवसांत एक अपघात होतो आहे.
2. रेल्वे विभागात महत्त्वाची लाखो पदे रिक्त असताना नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. यामुळेही अपघातांमध्ये भर पडत आहे.
3. रेल्वे हे सामान्य माणसांचे प्रवासाचे महत्त्वाचे साधन असले तरी, सामान्य माणसाचे हित नीचांकी तळाला पोहोचले आहे.
4. दर वर्षी 400 ट्रॅक देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो.
5. लोको पायलट्सवर कामाचा प्रचंड ताण असून, पदे रिक्त असूनही भरती न झाल्याने त्यांना सलग काम करावे लागते. ही वाटचाल रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने सुरू आहे.