Monday, November 17, 2025 06:33:56 AM

IMC 2025 : आयएमसी 2025 मध्ये तज्ञांचा दावा! भारत ठरवेल 6Gचे जागतिक भविष्य

भारतीय संशोधक, उद्योग नेते आणि जागतिक तज्ञांनुसार, भारताचे 6G संशोधन आणि नवीन कल्पना जगभरातील संवाद प्रणालीला नव्या दिशेने नेऊ शकतात.

imc 2025  आयएमसी 2025 मध्ये तज्ञांचा दावा भारत ठरवेल 6gचे जागतिक भविष्य

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 च्या 9 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. मिळालेल्या माहितीनुसार, 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञानाची थीम 'इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म' आहे, जी भारताच्या डिजिटल वाढ आणि सामाजिक बदलामध्ये नवीन कल्पना महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.

इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 च्या पार्श्वभूमीवर भारत 6G तंत्रज्ञानाच्या चांचण्यांच्या अगदी जवळ पोहोचला आहे. भारतीय संशोधक, उद्योग नेते आणि जागतिक तज्ञांनुसार, भारताचे 6G संशोधन आणि नवीन कल्पना जगभरातील संवाद प्रणालीला नव्या दिशेने नेऊ शकतात. याबाबत बोलताना, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे मुख्य 5G रणनीती तज्ञ आशुतोष दत्ता यांनी माहिती दिली की, 'प्रत्येक ठिकाणी मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय नसते. अशा परिरस्थितीत, उपग्रह तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते. भविष्यात अखंड संवादासाठी जमिनीवरील आणि अवकाशातील नेटवर्कचे एकत्रीकरण गरजेचे आहे'. पुढे आशुतोष दत्ता म्हणाले की, 'ऑपरेटर, शैक्षणिक संस्था आणि सेवा देणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन विविध वापरकर्त्यांसाठी प्रयोगशाळा आणि चाचणी केंद्रे तयार करावीत. सोबतच, डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेकडे देखील अधिक लक्ष दिले पाहिजे.

हेही वाचा: UPI Payment: आता तुमच्या बँक खात्यात पैसे नसले, तरीही UPI पेमेंट करू शकता, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

यादरम्यान, भारताच्या तांत्रिक कौशल्यावर भर देताना आशुतोष दत्ता म्हणाले की, 'भारताकडे तांत्रिकदृष्ट्या पुरेसे मनुष्यबळ आणि सरकारी पाठिंबा आहे. त्यामुळे, भविष्यातील 6G नेटवर्कसाठी शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यात अधिक सहकार्य गरजेचे आहे'.

यावेळी, लाय-फाय चे जनक म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक हॅराल्ड हास यांनी माहिती दिली की, 'फायबर इंटरनेट महाग किंवा खडतर असलेल्या क्षेत्रांत लाय-फाय (Li-Fi) तंत्रज्ञान क्रांती घडवू शकते'. पुढे, हॅराल्ड हास म्हणाले की, 'प्रकाशाद्वारे मोकळ्या जागेत डेटा पाठवता येतो, ज्यामुळे ग्रामीण भागात स्वस्त आणि जलद इंटरनेट मिळणे शक्य होते. सोबतच, सौर पॅनेलचा वापर ब्रॉडबँड रिसीव्हर म्हणून केला जाऊ शकतो'. यादरम्यान, जपानच्या एनआयसीटीचे कार्यकारी संचालक इवाओ होसाको म्हणाले की, 'संवाद आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताची ताकद जगात उत्कृष्ट आहे. भारत आणि जापान नवीन तंत्रज्ञान सेवा विकसित करण्यासाठी एकत्र काम करू शकतात'.


सम्बन्धित सामग्री