Raja Rammohun Roy Controversy : भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणे, ‘राजा राम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट…’

बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सवात बोलताना परमार यांनी थेट आरोप केला की, राजा राम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट (Agent) होते आणि त्यांनी देशाचे दलाल म्हणून काम केले.

Raja Rammohun Roy Controversy : भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणे, ‘राजा राम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट…’

MP Minister Statement on Raja Ram MOhan Roy : मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री आणि भाजप नेते इंदर सिंह परमार यांनी समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सवात बोलताना परमार यांनी थेट आरोप केला की, राजा राम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट (Agent) होते आणि त्यांनी देशाचे दलाल म्हणून काम केले. भाजप पक्षाने मात्र परमार यांच्या विधानाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मिशनरी शाळांच्या माध्यमातून धर्मांतरण
इंदर सिंह परमार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, "राजा राम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. त्यांनी देशाचे दलाल म्हणून काम केलं. एवढंच नाही तर त्यांनी धर्मांतरासारख्या गोष्टी आपल्या देशात सुरु केल्या." परमार यांनी बिरसा मुंडा यांचे मोठेपण सिद्ध करताना राजा राम मोहन रॉय यांच्यावर टीका केली. परमार पुढे म्हणाले, "राजा राम मोहन रॉय यांना रोखण्याचं धाडस जर कुणी दाखवलं असेल, तर ते बिरसा मुंडा होते. ब्रिटिशांच्या काळात मिशनरी शाळा होत्या, त्या शाळांच्या माध्यमातून धर्मांतरण चालत असे. शिक्षणाच्या नावाखाली मुलांचं धर्मांतरण केलं जाई. बिरसा मुंडा यांनी ही गोष्ट वेळीच ओळखली आणि आपल्या समाजासाठी ब्रिटिशांच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवली."

हेही वाचा – Rohini Acharya : किडनी देऊन वडिलांना वाचवलं.. पण आता कुटुंबीयांशी संबंध तोडले! रोहिणी आचार्य कोण आहेत आणि लालूंच्या कुटुंबात वाद का?

काँग्रेस आक्रमक
या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी परमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते भुपेंद्र गुप्ता म्हणाले, "परमार यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आणि लज्जास्पद आहे. राजा राम मोहन रॉय हे महान समाज सुधारक होते आणि सतीची प्रथा बंद करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. हे ब्रिटिशांचे दलालीचे काम होते का? जे त्या काळात इंग्रजांचे दलाल होते, आज तेच राजा राम मोहन रॉय यांच्यावर टीका करत आहेत." परमार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही टीका केली होती. बिरसा मुंडा यांना शिक्षण घ्यायचे होते, पण मिशनरी शाळांमध्ये धर्मांतरण सुरू असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ती शाळा सोडली आणि आपले आयुष्य समाजसेवेसाठी व्यतीत केले, असेही परमार यांनी सांगितले.

भाजपचे या प्रकरणापासून दूर राहण्याचे धोरण
हा वाद वाढू लागल्यानंतर भाजपने या प्रकरणापासून अंतर राखले आहे. भाजपचे प्रवक्ते शिवम शुक्ला यांनी स्पष्ट केले की, इंदर सिंह परमार यांनी राजा राम मोहन रॉय यांच्याबाबत केलेले विधान हे त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत आणि पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. ते म्हणाले, "भाजपने कायमच देशासाठी योगदान देणाऱ्या समाज सुधारकांचा सन्मान केला आहे. काँग्रेसने परमार यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे." परमार यांच्या विधानामुळे एका बाजूला समाजसुधारकांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे, तर दुसऱ्या बाजूला राजकीय टीकाटिप्पणीला नवे खाद्य मिळाले आहे.

हेही वाचा – Rohini Acharya : 'तुम्हाला चपलेनं मारलं जाईल…, त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढलं'; रोहिणी आचार्य यांचे कुटुंबियांबाबत धक्कादायक खुलासे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number