PM Modi on Maharashtra Election: ‘महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे…’; महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत नंबर 1 चा पक्ष होण्याचा मान मिळवला असून, महायुतीने 288 पैकी 200 पेक्षा जास्त जागांवर वर्चस्व गाजवले आहे.<br/>

PM Modi on Maharashtra Election: ‘महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे…’; महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

PM Modi on Maharashtra Election: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची दखल थेट केंद्रातून घेण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत नंबर 1 चा पक्ष होण्याचा मान मिळवला असून, महायुतीने 288 पैकी 200 पेक्षा जास्त जागांवर वर्चस्व गाजवले आहे.

हेही वाचा – Nagarparishad-Nagarpanchayat Election Result : ‘काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून..’; निवडणुकांच्या निकालानंतर रोहित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांचे कौतुक

विजयानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेला हा कौल लोककेंद्रित विकासावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जेने काम करण्यास वचनबद्ध आहोत.’ तसेच, त्यांनी तळागाळातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले.

अमित शाह यांचा ‘विजयी’ संदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विजयाचे वर्णन पंतप्रधान मोदींच्या जनकल्याणकारी धोरणांचा विजय असे केले आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ते म्हणाले, ‘हा विजय म्हणजे समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी एनडीए सरकारने केलेल्या कामाची पावती आहे.’ अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करत विजयाचा आनंद व्यक्त केला.

हेही वाचा – Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis: ‘पक्ष नेतृत्वानेच गटबाजीला खतपाणी घातलं…’; मुनगंटीवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष 

या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. महायुती आघाडीने राज्यातील 288 नगरपालिका संस्थांपैकी 200 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजप 118 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आतापर्यंत 59 जागा जिंकल्या आहेत. त्याच वेळी, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) 37 जागा मिळाल्या आहेत. आगामी राजकीय समीकरणांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number